देहविक्री करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी लोकपरिषद या सेवाभावी संस्थेने या महिलांना स्टॉल उपलब्ध करून दिले असून, या स्टॉलचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता नवीन पनवेल येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
नवीन पनवेलमधील डी. ए. व्ही. स्कूलजवळील किसान विक्रेता कल्याणकारी संस्था मार्केट येथे होणाऱ्या या कार्यक्रमास नगराध्यक्षा चारुशीला घरत, एड्स नियंत्रण संस्थेचे साहाय्यक संचालक अवशरन कौर, लोकपरिषद संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड, संचालक विमल गायकवाड यांच्यासह इनरव्हिल क्लबचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रकल्प व्यवस्थापक ऊर्मिला शिंदे यांनी सांगितले की, समाजाच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, महिला व बालक सबलीकरण आणि पर्यावरण जनजागृती या विषयांना अनुसरून लोकपरिषद ही संस्था व्यापक व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करीत आहे. सद्यस्थितीत ही संस्था रायगड व मुंबई जिल्ह्य़ांमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी व जेएनपीटी उरण येथे ट्रकचालकांसाठी एड्स नियंत्रण हस्तक्षेप प्रकल्प राबवीत आहे, तसेच पनवेलमधील शाळा व महाविद्यालयातील किशोरवयीन मुला-मुलींसाठी लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून एचआयव्ही एड्सबद्दल मार्गदर्शन कार्यशाळा, चर्चासत्र व जनजागृतीसाठी प्रभातफेरी आणि पथनाटय़ाचे आयोजन करीत असते, अशीही माहिती शिंदे यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Aug 2013 रोजी प्रकाशित
देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी पुनर्वसनाचे प्रयत्न
देहविक्री करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी लोकपरिषद या सेवाभावी संस्थेने या महिलांना स्टॉल उपलब्ध करून दिले असून, या स्टॉलचे उद्घाटन
First published on: 10-08-2013 at 04:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Efforts for rehabilitation of sex workers