वाई: सातारा शहरात सध्या पालकमंत्री आणि उदयनराजे यांच्यात इगो वॉर चालू आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मात्र शिवतीर्थाच्या परिसराच्या जागेवरून कोणतीही तडजोड होणार नाही. दोघांनीही अहंकार बाजूला ठेवावा असे मत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
एकाने पोवई नाक्यावरील भिंतीवर चित्र काढले तर दुसऱ्या नेत्याने नाक्यावरच आयलँड उभारण्याचा आग्रह धरला आहे. हा प्रकार म्हणजे नेत्यांचा इगो आहे. या इगोचा फटका सातारकर आणि शिवभक्तांना बसला आहे. मात्र छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या युगपुरुषांच्या संदर्भात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
साताऱ्यामध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी पोवई नाका परिसरात जुन्या आयलँडच्या जागेवर नवीन आयलँड बसवण्याचा प्रशासकीय हट्ट सुरू ठेवला आहे. त्यावरून साताऱ्यात शिवभक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
आणखी वाचा-“…म्हणून केसरकरांनी मला ऑफर दिली असेल”, जुना किस्सा सांगत अजित पवारांची प्रतिक्रिया
एकाने भिंतीवर चित्र काढले त्यामुळे दुसऱ्या नेत्याने येथील पोवई नाक्यावर आयलँड उभारण्याचे काम हाती घेतले आहे. हा प्रकार म्हणजे दोन्ही नेत्यांचा इगो आहे. या इगोमध्ये सातारकर आणि शिवभक्त गुंतून पडले आहेत. या इगो चा फटका सातारकरांना बसला आहे. या प्रकरणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले सामंजस्याची भूमिका घेतील असे वाटत नाही मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीच या प्रकरणी सामंजस्याची भूमिका घ्यावी.
उदयनराजे भोसले यांचे भिंतीवर चित्र काढण्याच्या संदर्भामध्ये बराच राजकीय वादंग झाला होता. आधी चित्र काढले नंतर चित्रकाराला विचारण्यात आले. परत चित्र थांबवण्यात आले. यामुळे बराच काळ राजकीय वादावादी सुरू होती . उदयनराजे यांच्याकडून सामंजस्याची अपेक्षाही नाही, कारण ते सतत स्वतःच्याच विश्वात असतात. छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या युगपुरुषांच्या संदर्भात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीच या प्रकरणी सामंजस्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.