लातूर : धाराशिव येथे जाणाऱ्या आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर टक्कर होऊन कार मधील तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास लातूर -बार्शी रस्त्यावरील ढोकी येथे घडली .

कळंब तालुक्यातील रांजणी येथून सीएनजी पंपात सीएनजी भरून आयशर टेम्पो एम एच २४ ए यु 67 22 हा धाराशिव कडे निघाला होता त्याचवेळी पुणे येथून लातूरच्या दिशेने जात असलेली कार महाराष्ट्र 14 ए क्यू 11 22 या दोन्ही वाहनाची ढोकी यथे समोर समोरासमोर टक्कर झाली व कारचालकासह तिघेजण जागीच ठार झाले .यात कारचालक केशव वाघमारे वय ३७ नितीन जटाळ ४७ व रामा सुरवसे 45 तिघेही राहणार कामखेडा तालुका रेणापूर यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.