सांगली : मिरजेतील स्टेशन रोड परिसरात नव्यानेच सुरू झालेल्या एका हॉटेलवर जमावाने हल्ला करत त्याची तोडफोड केली. या वेळी झालेल्या मारहाणीत दोन्ही गटांचे आठ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार व्यावसायिक स्पर्धेतून घडला असल्याची चर्चा असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन गटांतील संघर्ष कारणीभूत असल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आरसीएफ शाळेचा प्रश्न हातघाईवर…आमदार दळवींच्या पत्नीचा शिक्षण अधिकाऱ्यांवर रोष

मिरजेतील स्टेशन रोडवर काही दिवसांपूर्वीच अफगाण दरबार हे हॉटेल सुरू झाले आहे. नव्याने सुरू झालेल्या या हॉटेल परिसरात एक जुने हॉटेल आहे. या दोन्ही हॉटेलशी संबंधित दोन गटांमध्ये पूर्वीपासून वाद आहे. मागील काही दिवसांपासून हा वाद धुमसत होता. आठवड्याभरापूर्वी दोन्ही गटांत वाद झाल्यानंतर परस्परविरोधी तक्रारीही करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून हा वाद धुमसत होता. तो गुरुवारी उफाळून आल्याचे बोलले जात आहे. यांपैकी एका गटाने अफगाण दरबार या हॉटेलवर हल्ला चढवला. येथील काचा, टेबल, खुर्च्या आणि साहित्याची जोरदार तोडफोड केली. या वेळी दोन्ही गटांकडील काही लोकांना मारहाणही झाली.

हेही वाचा >>> Chhagan Bhujbal : छगन भुजबळ प्रकृती बिघडल्याने बॉम्बे रुग्णालयात, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यातून करण्यात आलं एअरलिफ्ट

यामध्ये आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्या सर्वांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हॉटेलची जोरदार तोडफोड करण्यात आली असून, हॉटेलमधील साहित्य रस्त्यावरही फेकण्यात आले होते. हॉटेलच्या काचांचा चक्काचूर करण्यात आला आहे. हॉटेलमधील टेबल-खुर्च्याही मोडल्या आहेत. यामुळे हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रकरणी सायंकाळपर्यंत कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नव्हती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight people injured in hotel vandalised by mob in miraj zws