सावंतवाडी : आंबोली (ता.सावंतवाडी) ते मांगेली (ता.दोडामार्ग) या सह्याद्रीच्या पट्ट्यात दुर्मिळ होत चाललेल्या आठ वाघांचे अस्तित्व वन विभागाच्या जनगणनेत आढळून आले आहे. त्यामुळे या सह्याद्रीच्या पट्ट्यात मुंबई उच्च न्यायालयात व्याघ्र कॉरिडॉर होण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेला बळकटी मिळाली आहे. वनशक्ती संस्थेची याबाबत न्यायालयात याचिका सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने सह्याद्री कोकण कॉरिडॉर ची घोषणा केल्यानंतर आता वन्य प्राण्यांना ही सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील जंगल परिसर सुरक्षित वाटू लागला असून सिंधुदुर्ग च्या इतिहासात प्रथमच वन्य प्राण्यांच्या जनगणेत आठ वाघाची नोंद झाली आहे.यात तीन नर तर पाच मादीचा समावेश आहे. जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हे वाघ कैद झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  बांदा ते दाणोली रस्त्याचे दूपदरीकरणाचे ऑनलाईन भूमिपूजन, तर रस्त्यावर बावळट येथे सभामंडप जाळला

पाच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या व्याघ्र जनगणेत वाघाची संख्या शून्य वर आली होती त्यामुळे वन्यप्रेमीत चिंतेचा विषय होता.पण ही संख्या वाढल्याने वन्य प्रेमी ही चांगलेच सुखावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग या दोन  तालुक्यात गेल्या काहि महिन्यापासून शेतकऱ्यांच्या गुरावर मोठ्याप्रमाणात हल्ले वाढू लागले होते.त्यामुळे हे हल्ले वाघा कडून च होत असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले होते.तसेच काहि ठिकाणी वाघ प्रत्यक्षात वन कर्मचाऱ्यांना दिसून आले खडपडे येथे ही वाघ पाणी पितानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता.वाघाचा वाढता वावर निसर्ग प्रेमींना सुखद धक्का देणारा होता.

त्यातच सिंधुदुर्ग वनविभाग तसेच सह्याद्री टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट  डब्लू सी टी ही स्वयंसेवी संस्था अशा तिघांनी मिळून जानेवारी महिन्यात वाघांची जनगणना केली यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत जंगलातील प्रमुख ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यात सावंतवाडी पासून दोडामार्ग तालुक्यातील जंगलात तब्बल आठ वाघ आढळून आले एवढे मोठ्याप्रमाणात वाघ दिसण्याचे सिंधुदुर्ग च्या इतिहासात प्रथमच घडले आहे.कारण २०१४ च्या जनगणेत वाघांची संख्या ही पाच होती तर २०१९ मध्ये हीच संख्या शून्य वर आली होती मात्र आता २०२४ मध्ये वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.विशेष म्हणजे यात तीन नर व पाच मादीचा समावेश आहे.

हेही वाचा >>> Sayaji Shinde : मोठी बातमी! अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याला लागूनच कर्नाटक तसेच गोव्याचे जंगल आहे.मात्र वाघा ना सिंधुदुर्ग चे जंगल अधिक सुरक्षित वाटत असल्याने अनेक वेळा हे वाघ कॅमेऱ्यात ट्रॅप झाले आहेत.मात्र वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे वाघ जरी सिंधुदुर्ग च्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाले असले तरी गोवा कर्नाटक तसेच राधानगरी अभयारण्या पर्यत यांचा प्रवास हा सुरूच असतो पण त्याना येथील जंगल अधिक सुरक्षित वाटत असले हे वनाधिकारी यांनीही मान्य केले.

वाघांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाय

उपवनसंरक्षक वाघांची संख्या वाढली असल्याने आता त्याची सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असून दिवस रात्र जंगलात पेट्रोलिंग तसेच कॅमेऱ्यातून नजर ठेवणे बाॅर्डर परिसरात नजर ठेवणे आदि काम हाती घेण्यात आल्याचे सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight tigers existence in sahyadri belt of sindhudurg district zws