लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोलापूर : जबरी चोऱ्यांसारखे १९ गुन्हे नावावर असलेल्या आणि मोक्का कायद्याखाली गुन्हा दाखल खटल्यात दोघा आरोपींना आठ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा लाख रूपये दंडाची शिक्षा सोलापूरचे मावळते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ. शब्बीरआहमद औटी यांनी ठोठावली आहे. किसन शामराव काळे आणि लखन लकय्या काळे (दोघे रा. चिंचोळी काटी, ता. मोहोळ) अशी शिक्षा झालेल्या २५ वर्षे वयोगटातील दोघा आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी दीपक नागनाथ धोत्रे यास सबळ पुराव्या निर्दोष ठरविण्यात आले आहे. न्यायालयात खटला सुरू झाल्यापासून अवघ्या १५ दिवसांत त्याचा निकाल देण्यात आला.

भंगार मालाचा व्यवसाय करणारे संजय अमिरका गुप्ता (वय २८) हे शहरानजीक कोंडी फाटा येथे राहतात. ३० डिसेंबर २०१४ रोजी रात्री गुप्ता कुटुंबीय जेवणखान करून घरात झोपले असताना पहाटे सशस्त्र चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. काठी तलवारीने मारहाण करून गुप्ता यांच्या घरातून सोन्याचे बानावट दागिने व इतर ऐवज लुटला. तत्पूर्वी, या चोरट्यांनी दत्तात्रेय गवळी (रा. अकोलेकाटी, ता. उत्तर सोलापूर) व इतरांची घरेही लुटली होती. यापूर्वी हेच चोरटे गुप्ता यांच्या भंगार मालाच्या दुकानात भंगार विक्रीसाठी आले होते. त्यामुळे त्यांना गुप्ता यांनी ओळखले होते.

आणखी वाचा-हिंगोलीतील ‘टोकाई’कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून तिघा आरोपींना अटक केली असता त्यांच्यावर १९ गुन्हे प्रलंबित असल्याचे दिसून आले. त्याचे गांभीर्य पाहून त्यांच्याविरूध्द मोक्का कायद्याखाली खटला दाखल करण्यात आला.

या खटल्यात सरकारतर्फे ॲड. माधुरी देशपांडे यांनी १८ साक्षीदार तपासले असता त्यात फिर्यादी गुप्ता सरकार पक्षाच्या विरोधात फितूर झाला. मात्र कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे,तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक के. एल. बिष्णोई, सोलापूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णकांत उपाध्याय, सहायक पोलीस निरीक्षक विजय यादव यांची साक्ष महत्वाची ठरली. या खटल्यात वैद्यकीय अहवाल उपलब्ध नव्हता. कारण संबंधित न्यायवैद्यक अहवालाची कागदपत्रे चोरीला गेली होती. सरकारी वकील माधुरी देशपांडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून दोघा आरोपींना दोषी ठरविण्यात आले. आरोपींतर्फे ॲड. एस. आर. गडदे यांनी काम पाहिले.