“महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केलं गेलं आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते (शरद पवार) केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषीमंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात (केंद्रीय कृषीमंत्री म्हणून) देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत १३.५ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील कार्यक्रमात केले. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान मोदी शरद पवारांवर टीका करत असातना त्यांचे पुतणे अजित पवार त्याच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे सध्या अजित पवारांना शरद पवार गटाने लक्ष्य केलं आहे. अजित पवारांनी याबाबत उत्तर द्यायला हवं, असंही शरद पवार गटाकडून म्हटलं जातंय. दरम्यान, माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनीही अजित पवारांवर सडकून टीका केली आहे.
“एकतर अजित पवारांनी…”, मोदींच्या शरद पवारांवरील टीकेवर अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्रात आले होते, महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी शरद पवारांबाबत वक्तव्य केलं.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-10-2023 at 15:33 IST
TOPICSअजित पवारAjit Pawarअनिल देशमुखAnil Deshmukhनरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi Newsशरद पवारSharad Pawar
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Either ajit pawar anil deshmukhs reply to modis criticism of sharad pawar sgk