भोसरी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खडसे यांचे विरोधक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भोसरी प्रकरण उचलून धरलं आहे. भोसरी प्रकरणावरून थेट विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी महाजन यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावरून एकनाथ खडसे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते. “कामाच्या आणि संपर्काच्या बळावर तुम्ही ४० वर्ष मला साथ दिली. कामाच्याबाबत मागे राहणार नाही. त्यामुळे पुढच्या काळातही अशीच साथ राहुद्या. मात्र, विरोधकांना माझी अडचण होत आहे. आयुष्यभर एक रुपयाही गैर मार्गाने मी कमवला नाही,” असेही खडसे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते…”, आदित्य ठाकरेंना अब्दुल सत्तारांचा खोचक टोला!

“माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारे आरोप करुन मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणूका सुलभ करण्यासाठी जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. पण, हे सर्व मी हाणून पाडत आहे. रोज मला व्हॉट्सअॅपवर ‘काहीतरी होणार आहे’, असे मेसेज येतात. मात्र, मला त्रास दिला तर, तुमच्या बोकांडी बसेन,” असा इशारा एकनाथ खडसे यांनी शिंदे-भाजपा सरकारला दिला आहे.