जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. संघात झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी एकनाथ खडसे जळगाव पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनाला बसले आहेत. मात्र, गुन्हा दाखल होत नसल्याने खडसेंनी अधिकाऱ्याला चक्क हात जोडून अधिकाऱ्याला उद्देशून मी तुमच्या पाया पडतो गुन्हा दाखल करा, अशी विनंती केली आहे.

जळगाव जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी खडसे काही तासांपासून जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये निरीक्षकांच्या दालनात आंदोलनाला बसले आहेत.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले

हेही वाचा – “माझा भाऊ कॉप्या करुन…”; मुख्यमंत्री शिंदेंचा ‘ढ’ असा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

एकनाथ खडसेंची गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. तर, दुसरीकडे कायदेशीर बाबीचे कारण पुढे करत पोलीस अधिकारी समजूत घालत आहेत. तसेच, चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. मात्र, खडसे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. मी मेलो तरी गुन्हा दाखल केल्याशिवाय जाणार नाही, असेही खडसेंनी ठणकावून पोलिसांना सांगितले आहे.

हेही वाचा – माझं पाच वर्षांचं बाळ आहे, मला कालपासून काही धोके जाणवताय – सुषमा अंधारेंचं पत्रकारपरिषदेत विधान!

दरम्यान, राजकीय दबावापोटी पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. पोलिसांनी रात्री १२ वाजता एकनाथ खडसेंचे निवेदन स्वीकारले. पण, गुन्हा दाखल न केल्याने खडसे रात्री पोलीस स्टेशनबाहेरच झोपले होते.