अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. “गिरीश महाजनांचे दाऊद इब्राहिमचे हस्तक सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्यानं एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खडसेंनी केली,” अशी मागणी खडसेंनी विधानपरिषदेत केली. तर, खडसेंच्या पोटात दुखत असल्याची टीका महाजनांनी केली होती. याला खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?

“एकनाथ खडसेंच्या पोटात दुखत आहे. खडसेंना मुरूम चोरल्याप्रकरणी १३७ कोटी तर, भोसरी एमआयडीसी प्रकरणात २७ कोटींचा दंड झाला आहे. खडसेंच्या सर्व मालमत्ताही जप्त केल्या आहेत. आता खडसेंच्या पायात चप्पल सुद्धा घालायला राहणार नाही, अशी अवस्था त्यांची झाली आहे. म्हणून ते बावचळले आहेत,” असा टोला महाजनांनी लगावला आहे.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

हेही वाचा : “गिरीश महाजनांचे सलीम कुत्ताबरोबर संबंध”, खडसेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देत फडणवीस म्हणाले, “हीच तडफड…”

“महाजनांकडे १० वर्षात करोडोंची मालमत्ता कशी आली?”

याला खडसे प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी वैफल्यग्रस्त आहे की चांगला हे महाराष्ट्र पाहतोय. गिरीश महाजन उत्तर देऊ शकत नाहीत. महाजन सर्वसाधारण शिक्षकाचे चिरंजीव आहेत. त्यांच्याकडे गेल्या १० वर्षात करोडोंची मालमत्ता कशी आली? या मालमत्तेच्या चौकशी मागणी मी केली. तरीही सरकार चौकशी करत नाही.”

“१३७ कोटींची नोटीस राजकीय द्वेषापोटी”

“माझ्या पायात चप्पल राहणार नाही की महाजनांच्या पायात चप्पल राहणार नाही, हे काळ ठरवेल. १३७ कोटींची नोटीस मला राजकीय द्वेषापोटी देण्यात आली आहे. मी तिथून एक ब्रासही मुरूम उचलला नाही. तो राष्ट्रीय महामार्गानं उचलला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराला मोफत मुरूम देण्यात आला आहे. ते ठेकेदार न्यायालयात आपली बाजू मांडत आहेत. ही न्यायप्रविष्ठ बाब आहे. पण, माझ्याकडून १३७ कोटी वसूल करून दाखवावे,” असं आव्हान खडसेंनी महाजनांना दिलं आहे.