अजित पवारांसह ९ जणांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल सुरू झाले आहेत. आज ( २९ ऑगस्ट ) राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवारांनी रोहिणी खडसेंच्या नियुक्तीचे पत्र दिलं आहे.

रोहिणी खडसे या माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. रोहिणी खडसे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान संचालिका आहेत. राज्यात महिलांचं संघटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं रोहिणी खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad Pawar , Ajit Pawar, Sharad Pawar latest news,
शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर?
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Video Viral poster
Video Viral : “बायकोला तिळगूळ देणे ही अंधश्रद्धा!”, हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, नेटकरी, म्हणे, “भावा…”
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
minister ashish shelar criticized sharad pawar over conflict in mva
शरद पवारांच्या राजकीय ऱ्हासाला सुरुवात : आशिष शेलार

हेही वाचा : “संतोष बांगर मुख्यमंत्री झाले, तर मला आवडेल, दररोज…”, जितेंद्र आव्हाड यांचं विधान

रोहिणी खडसे म्हणाल्या, “मला महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार फौजिया खान यांच्या आभारी आहे. महाराष्ट्रात महिलांचं संघटन वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल.”

तुम्हाला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने विद्या चव्हाण नाराज आहेत का? असा प्रश्न विचारल्यावर रोहिणी खडसे यांनी म्हटलं, “विद्या चव्हाण नाराज नाहीत. त्यांच्या उपस्थितीत मला पत्र देण्यात आलं. विद्या चव्हाण यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.”

हेही वाचा : “न ‘होणाऱ्या’ बाळासाठी खोटी सजावट, पण…”, भाजपाचा ठाकरे गटाला टोला

भाजपाची कार्यकारणी कसं काम करते, हे मला माहिती आहे. त्यामुळे काम करणं सोप्प होईल,” असेही रोहिणी खडसे यांनी सांगितलं.

Story img Loader