महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक अनपेक्षित पक्षांतरं झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरावेळी यासंदर्भात मोठी चर्चा झाली. आता पुन्हा एकदा एक चर्चेतलं पक्षांतर राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलं आहे. एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही अर्थात भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. मुळात अजूनतरी या पक्षांतराची फक्त चर्चाच असताना त्यावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. त्यातच आता रोहिणी खडसेंच्या एका पोस्टमुळे ही सगळी चर्चा खडसे कुटुंबाभोवती केंद्रीत झाली आहे.

नेमकं घडतंय काय?

जवळपास चार वर्षांपूर्वी, अर्थात २१ ऑक्टोबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी पक्षाकडून मिळत असलेल्या चुकीच्या वागणुकीवर बोट ठेवून भाजपाला रामराम ठोकला होता. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजतागायत एकनाथ खडसेंनी सातत्याने भारतीय जनता पक्ष व पक्षातील नेतेमंडंळींवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडलेली नाही. खुद्द जळगावमध्ये गिरीश महाजन यांच्यावर त्यांनी सातत्याने हल्लाबोल केला आहे. मात्र, आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या घरवापसीच्या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Loksatta kutuhal How minerals got their names
कुतूहल: खनिजांना नावे कशी मिळाली?

खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ

खडसेंबाबत नेमकी काय चर्चा होतेय?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर एकनाथ खडसेंनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता ते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर एकनाथ खडसेंना नेमकी कोणती जबाबदारी मिळेल याविषयीही तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यांना खासदारकीचं तिकीट मिळण्याचे अंदाज बांधले जात आहेत. दुसरीकडे त्यांना एखाद्या राज्याचं राज्यपालपद मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. खुद्द एकनाथ खडसेंनी मात्र अद्याप यावर कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.

रोहिणी खडसेंची पोस्ट चर्चेत!

दरम्यान, एकीकडे एकनाथ खडसेंच्या घरवापसीची चर्चा चालू असताना दुसरीकडे त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर (ट्विटर) केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. “मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी याच पक्षात आहे आणि भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी शरद पवारांसोबतच. लडेंगे और जीतेंगे”, असं रोहिणी खडसेंनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. यासह त्यांनी हातात तुतारी घेतलेला एक फोटोही शेअर केला आहे.

kHADSE-RESIGNATION-316x447
एकनाथ खडसेंनी भाजपातून बाहेर पडताना दिलेला राजीनामा (संग्रहीत छायाचित्र)

खडसेंच्या प्रवेशामुळे पाटलांची पंचाईत?

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा जशा सुरू आहेत, तशाच या शक्यतेमुळे भाजपाचे मुक्ताईनगरमधील आमदार चंद्रकांत पाटील यांची धाकधूक वाढल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. खडसे भाजपामध्ये आल्यास त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून विधानसभेसाठी उमेदवारी मिळू शकते या भीतीपोटी पाटील यांची धाकधूक वाढल्याचं बोललं जात आहे.

Story img Loader