आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून गुरुवारी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे पुतणे हरीश खडसे यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिसांनी आकोट येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या समितीच्या बांधकामात मोठा गैरव्यवहार झाला होता. त्याची तक्रार समितीच्या सचिवांनी पोलीस ठाण्यात केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर वास्तुविशारद हरीश खडसे, कंत्राटदार अग्रवाल, सभापती हिंगणकर यांच्यासह चौघांविरुद्ध आकोट पोलीस ठाण्यात गेल्या डिसेंबरमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या प्रकरणात गुरुवारी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2015 रोजी प्रकाशित
खडसेंच्या पुतण्यासह चौघांविरुद्ध आरोपपत्र
आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून गुरुवारी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे पुतणे हरीश खडसे यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिसांनी आकोट येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
First published on: 03-07-2015 at 03:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse nephew booked 3 july