अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. संबंधित सर्व आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सकारला समर्थन दिल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या सत्ताबदलावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.

देवेंद्र फडणवीस हा खोटारडा माणूस आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. देवेंद्र फडणवीसांनी काही महिन्यांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करणार नाही, म्हणजे नाही… असं रोखठोकपणे सांगितलं होतं. पण आता देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सामील करून घेतलं आहे.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

हेही वाचा- “थोडं भरकटलो होतो, आता ती चूक…”, ठाकरे गटात प्रवेश करताच शिवसेनेच्या माजी खासदारानं मागितली माफी

या राजकीय घडामोडीवरून एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले, “भाजपाकडे १०५ आमदार आहेत आणि एकनाथ शिंदे गटाकडे ४०-४२ किंवा ५० आमदार (शिंदे गट+अपक्ष आमदार) आहेत. म्हणजेच सरकार बहुमतात आहे. असं असताना बाकीच्यांना महायुतीत नेण्याची काही आवश्यकता नव्हती. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती नाही… नाही… नाही… एकवेळ ते लग्न न करणं पसंत करतील. अविवाहित राहणं पसंत करतील. पण राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही, असं ते बोलले होते. काय खोटारडा माणूस आहे, लगेच बदलले.”