भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना खडसे यांनीच पूर्णविराम दिला आहे. जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर खडसे पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या भेटीसंदर्भात आता खडसे आणि त्यांच्या कन्या तसेच भाजपाच्या नेत्या रक्षा खडसे यांनी उत्तर दिलं आहे.
नक्की पाहा >> ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी : निर्णयानंतर CM शिंदे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले अन्…; पाहा Video
एकनाथ खडसे यांनी अमित शाहांना भेटण्यासाठी गेल्याची माहिती खरी असल्याचं सांगतानाच अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर आपले मागील अनेक वर्षांपासून चांगले वैयक्तिक संबंध असल्याचं म्हटलं आहे. “अमित शाहांना एकदा भेटलो नाही याआधी पण भेटलो आहे. देवेंद्रजींनाही भेटलो आहे आणि या पुढेही भेटणार आहे. शहांना भेटू नये असा नियम आहे. हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून माझे संबंध आहेत,” असं उत्तर खडसे यांनी दिलं आहे.
नक्की वाचा >> शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”
एकाच घरामध्ये दोन पदं असल्याच्या मुद्द्यावरुन होणाऱ्या टीकेलाही खडसेंनी उत्तर दिलं आहे. “एका घरात दोन पदं दोन पद आहेत ते वेगवेगळ्या पक्षांच्या आहेत. तरी त्याला काय झालं?” असा प्रश्न खडसेंनी विचारला. तसेच खडसेंनी भाजपाच्या गिरीश महाजनांपासून अनेक नेत्यांची नावं घेत त्या नेत्यांच्या घरातही दोन व्यक्तींकडे वेगवेगळी पदं असल्याचं नमूद केलं. “राजकारणात ज्यांच्यात निवडून यायची क्षमता असेल ते येतात. क्षमता नसेल त्याला पराभूत करते,” असंही खडसे म्हणाले.
नक्की वाचा >> “मुख्यमंत्री शिंदेंनी शिवाजी पार्कवर मेळावा घेतला असता तर…”; ठाकरेंना परवानगी मिळाल्यावर शिंदे गटाकडून दावा
तर या भेटीसंदर्भात विचारलं असता खडसे यांच्या कन्या रक्षा खडसे यांनी, “त्या दिवशी आम्ही गेलेलो भेटीसाठी. मात्र त्यांच्या (अमित शाहांच्या) व्यस्त कार्यक्रमामुळे भेट होऊ शकली नाही. मात्र फोनवर खडसे आणि शाह यांची चर्चा झाली,” असं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच खडसे भाजपामध्ये जाणार का यासंदर्भात विचारलं असता रक्षा खडसेंनी, “लोकांना चर्चा करायची ते करणार ते भाजपामध्ये येण्याची कल्पना नाही. मी भाजपात आहे ते राष्ट्रवादीत आहेत,” असं रक्षा खडसे यांनी सांगितलं.