भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीवर भाष्य केलं होतं. शरद पवारांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं, असं उदयनराजे म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी उदयनराजेंना प्रत्युत्तर दिलं आहे. उदयनराजे यांनी आधी राजकारणातून निवृत्त व्हावं, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उदयनराजे यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले, “केंद्र सरकारची ज्येष्ठ नागरिकाची व्याख्या लक्षात घेतली तर ६० वर्षांवरील जेवढे लोक असतील ते सर्वजण सेवानिवृत्त होतात. त्यामध्ये उदयनराजेही बसतात. त्यामुळे उदयनराजेंनी एक ठरवलं पाहिजे की, आता मी ज्येष्ठ नागरिक झालो आहे, आता राजकारणात मलाही रस नाही. शरद पवारांना जसं राजकारणातून निवृत्त व्हा, अशा सूचना दिल्या जातात. तसेच ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नेत्यांना राजकारणातून निवृत्त करण्याबाबत योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा.”

rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
CM Eknath Shinde, Eknath Shinde visit Buldhana,
“आई भवानी आमच्या सावत्र भावांना सुबुद्धी….”, दर्शनाला गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना डिवचले
Devendra Bhuyar and Ajit pawar
Ajit Pawar : मुलींबाबत देवेंद्र भुयारांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…
Bhosari Vidhan Sabha, Vilas Lande, Sharad Pawar group,
भोसरी विधानसभा: विलास लांडेंचं ठरलं; या दिवशी करणार शरद पवार गटात प्रवेश; मुलानेच दिली माहिती
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : “आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी त्यांची बंदूक फक्त प्रदर्शनाला ठेवायची का?”, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
chandrashekhar bawankule back nitesh rane over controversial remarks on muslim
बावनकुळेंकडूनही नितेश राणेंची पाठराखण, म्हणाले ” त्यांचे वक्तव्य…”

हेही वाचा- असदुद्दीन ओवेसींकडून इस्रायली पंतप्रधानांचा ‘सैतान’ उल्लेख; पंतप्रधान मोदींचं नाव घेत म्हणाले…

उदयनराजे नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवारांच्या निवृत्तीवर भाष्य करताना उदयनराजे भोसले म्हणाले, “माझी निवडणुकीची हौस भागली आहे. बघता बघता पन्नाशी कधी ओलांडली समजलं नाही. शाळा आणि कॉलेज कधी संपलं, हेही कळालं नाही. आता कुठेतरी प्रत्येकानं थांबलं पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय असते. तसे, राजकीय नेत्यांनाही लागू केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक राजकीय नेता लोकांचा आग्रह असल्याने उभं राहिलो, असं सांगतात. शरद पवार यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं. कारण, मुख्यमंत्री आणि केंद्रातही अनेक वर्षे ते मंत्री राहिले आहेत. अनेकांना वाटतं शरद पवारांकडून मार्गदर्शन घ्यावं. त्यामुळे शरद पवारांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणं, मला योग्य वाटतं.”