जळगाव जिल्हा बँकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रवींद्र भैय्या पाटील यांचा पराभव झाला. गुप्त पद्धतीनं झालेल्या मतदानानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर संजय पवार विजयी झाले आहेत. दरम्यान, हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या संजय पवार या गद्दार नेत्याला हाताशी घेतलं त्यामुळे भाजपाला हे यश मिळालं आहे.
खडसे म्हणाले की, गद्दारीमुळे यांना यश मिळालं, नाहीतर त्यांची विजयाची लायकी नव्हती. खडसे गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना म्हणाले की, तुमचं हे यश निर्भेळ नाही. मुळात जळगावात मी भारतीय जनता पार्टी मजबूत केली म्हणून गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना पक्षात स्थान मिळालं आहे. आमच्यातला एकजण गद्दार झाला म्हणून यांना जिल्हा बँक मिळाली. अन्यथा आमचा पराभव शक्य नव्हता. या विजयानंतर महाजन जे काही बोलत आहेत, ते केवळ अहंकारापोटी आहे. एकटा नाथाभाऊ यांना भारी पडतोय.
हे ही वाचा >> Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू
लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकून दाखवा
खडसे म्हणाले की, एखाद्या निवडणुकीत गद्दारी करून जिंकणं हा काही मोठा पुरुषार्थ नाही. समोरासमोर लोकशाही पद्धतीने निवडणूक लढून दाखवा आणि जिंकून दाखवा.