भाजपा नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात जुंपली आहे. एकनाथ खडसे यांना एक मुलगा होता. त्याची हत्या झाली की आत्महत्या केली. मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेचं भलं आहे, असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला होता. यावर आता एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“गिरीश महाजन अस्वस्थ असून, त्यांना काय बोलवं हे सुचत नाही. नीच आणि खालच्या स्तरावरील राजकारण मी केलं नाही. त्यांचे अनेक उद्योग मला माहिती आहेत. महाजन यांचे केंद्रात आणि राज्यात सरकार असून, माझ्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या याची चौकशी करावी,” असे आव्हान एकनाथ खडसे यांनी दिलं.

हेही वाचा : “५० रेडे गुवाहाटीला चालले” म्हणणाऱ्या संजय राऊतांना शिंदे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आवाजही न फुटणाऱ्या पेंग्विनपेक्षा…”

“माझी ईडी, सीबीआय आणि लाचलुचपत विभागातर्फे चौकशी सुरु आहे. माझ्या जावयाला जेलमध्ये टाकलं आहे. मी ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. दुर्दैवाने जे चाललं आहे, त्याचं वाईट वाटत. महाजन यांना मुलगा नसल्याने त्यांना माझं दु:ख कळणार नाही,” असेही एकनाथ खडसे यांनी सांगितलं. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा : गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी

काय आहे प्रकरण?

शनिवारी ( १९ नोव्हेंबर ) राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना मुलगा नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आज ( २१ नोव्हेंबर ) गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं. “मला दोन मुली असून, त्यांना राजकारणात आणलेलं नाही. त्याचा मला आनंद आहे. मात्र, खडसेंना प्रश्न आहे, त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं? त्यांच्या मुलाने हत्या झाली की आत्महत्या केली? हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातचं खडसेंचं भलं आहे,” असे गिरीश महाजन म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse reply girish mahajan on son murder suicide question ssa
Show comments