राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण सतत एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. मंगेश चव्हाण हे एका कार्यक्रमानिमित्त आज (३१ जुलै) दुपारी मुक्ताईगरमध्ये म्हणजेच एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांना ‘तुमच्या विषयाचं ऑडिट होणार’ असा इशाला दिला. चव्हाण म्हणाले की, “खडसेंच्या विषयाचं ऑडिट होणार आणि ते जनतेसमोर येणार. मी एकदा कमिटमेंट केली की मी स्वत:चंसुद्धा एकत नाही. चव्हाण यांच्या या वक्तव्याला आता एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ खडसे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना मंगेश चव्हाणांनी दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर एकनाथ खडसे म्हणाले, तुला (मंगेश चव्हाण) कोणी अडवलं बाबा? सांगतो कशाला? ऑडिट कर, फॉडिट कर, काय करायचं ते कर. मी बापजाद्यांपासून श्रीमंत आहे. तुझ्यासारखा हमाल आणि भंगार विकणारा मी होतो का? मी एका चांगल्या घरचा माणूस आहे. तुला काय ऑडिट करायचं ते कर.

एकनाथ खडसे मगेश चव्हाणांना उद्देशून म्हणाले, तुला जे ऑडिट करायचं आहे ते कर, आत्ता सरकार तुझं आहे, कुठलं ऑडिट करायचं ते कर. तुला ज्या भानगडी करायच्या असतील त्या कर. ईडी लावलीय, आयकर विभाग लावला, आणखी तुला काय बघायचं आहे ते बघ. तुझी काय कुवत आहे? समाजात तुझी किंमत काय? तुला समाजात काय मान्यता आहे?

हे ही वाचा >> Jaipur Mumbai Express Firing : “हल्लोखोर आरपीएफ जवान भाजपाचा…”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत असदुद्दीन ओवैसींचा टोला

एकनाथ खडसे म्हणाले, एवढी शक्ती जरा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लावा. तुमच्यात दम असेल तर कापसाला भाव देऊन दाखवा ना, त्याबद्दल बोलायला तुम्ही तयार नाही. उगाच बाकिच्या भानगडी काय काढत बसता. तुम्हाला काय काढायचं ते काढा. तुम्हाला कोणी अडवलंय?

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse says do whaterver you want on mangesh chavan audit warning asc