राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी एका समितीची शिफारस केली. या समितीने शरद पवारांचा निर्णय फेटाळला असला तरी पवारांच्या राजीनाम्यापासून मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. याबाबत वेगवेगळ्या पक्षांचे नेते वेगवेळ्या प्रतिक्रिया देत आहेत. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ खडसे म्हणाले, लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली. तसेच त्यांनी राजीनाम्याचा मनोदय व्यक्त केला. खरंतर शरद पवार या व्यक्तीमत्त्वाचं गुढ अनेकांना उकलता आलेलं नाही. ते कोणाला अजून कळले नाहीत. त्यांनी राजीनामा का दिला, कशासाठी दिला, त्यांचा हेतू काय होता आणि या राजीनाम्याचे परिणाम काय होतील? हे आज तरी मला सांगता येणार नाहीत. एकनाथ खडसे एबीपी माझाशी बोलत होते.

हे ही वाचा >> शरद पवारांची भेट घेऊन निर्णय कळवल्यानंतर प्रफुल्ल पटेलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांनी ठरावावर…”

दरम्यान, राष्ट्रवादीचे पुढचे अध्यक्ष कोण होणार, अजित पवार की सुप्रिया सुळे असा सवाल एकनाथ खडसे यांना विचारण्यात आला. यावर खडसे म्हणाले, मुळात सर्वांची इच्छा आहे की, पवार साहेबच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहिले पाहिजेत. पण शरद पवार नसतील तर मग नंतर कोण असा प्रश्न येतोच. मग चर्चेत वेगवेगळी नावं येत राहतात. खासदार सुप्रिया सुळे असतील, महाराष्ट्रासाठी अजित पवार असतील. परंतु या चर्चा आहेत. शरद पवार यांनी नेमलेल्या समितीला त्यासंबंधीचा निर्णय घ्यायचा आहे. येत्या काही दिवसात काय निर्णय होतो ते आपल्याला समजेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse statement on next ncp president sharad pawar ajit pawar supriya sule asc