Eknath Khadse : लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ खडसे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. या चर्चांवर बोलताना एकनाथ खडसे यांनी आपण पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचंही माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांचा भाजपात प्रवेश होईल, असं बोललं जात होतं. मात्र, लोकसभेच्या निवडणुका होऊन काही महिने उलटले तरीही अद्याप एकनाथ खडसेंचा भाजपात अधिकृत प्रवेश झालेला नाही.

यावरून एकनाथ खडसेंचा भाजपात प्रवेश नक्की कधी होणार? याबाबत अनेकदा राजकीय वर्तुळात प्रश्नही विचारण्यात आले. दरम्यान, आता खुद्द एकनाथ खडसे यांनीच आपल्या भाजपाच्या प्रवेशाबाबत मौन सोडत मोठं विधान केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपाला इशाराही दिला आहे. “भाजपाकडून अद्याप प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मी आणखी काही दिवस भाजपाची वाट पाहील. अन्यथा मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जॉईन करेन”, असं विधान एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं आहे.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
kalyan east shinde shiv sena city chief mahesh gaikwad including nine expelled from shiv sena
कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

हेही वाचा : Indrajit Sawant : “छत्रपती शिवरायांनी दोनदा सूरत लुटलं, राजकारणासाठी इतिहास…”, इंद्रजित सावंत यांची फडणवीसांवर टीका

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा याबाबत मी भारतीय जनता पक्षाला विनंती केली होती. मात्र, भाजपाकडून अद्याप प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचा सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सदस्यपदाचा राजीनामा मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे दिला. मात्र, त्यांनी तो राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. तसेच मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) आमदार आहे. शरद पवारांनी मला आमदारकीचा राजीनामा देण्यास विरोध केलेला आहे”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

“मग अशा परिस्थितीमध्ये मी आणखी काही दिवस भारतीय जनता पक्षाची वाट पाहील. अन्यथा मी माझा मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुन्हा जॉईन करेन आणि कामाला सुरुवात करेन. भाजपात प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं. त्यासाठी काही कारणंही होते. त्या संदर्भात मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे चर्चाही केली होती. माझ्याकडे अडचणी होत्या, त्यामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, असं असं वाटलं होतं. मात्र, आता मला विचार करावा लागेल”, असं मोठं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.