मागील दोन वर्षांपासून करोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे सण साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता करोना संसर्ग कमी झाल्यामुळे यावेळी सर्व सण जल्लोषात साजरे केले जाणार आहेत. त्यासाठी यापूर्वीच राज्य सरकारने सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. दरम्यान आता दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे परिपत्रकदेखील काढण्यात आले आहे.

हेही वाचा >> “२७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे कोणाला दिसत नाहीत, पण राज्यपालांच्या…”, कोश्यारींच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांचे विधान

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सव हे साण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यासाठी राज्य सरकारनेही सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. सण साजरे करताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खरबदारी घेण्याची सूचना राज्य सरकारने प्रशासनाला दिली आहे. असे असताना दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे परिपत्रकही काढण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार येत्या १९ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी असेल.

हेही वाचा >> ज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा काय अपमान झाला? त्यांचे समर्थन करतो- प्रकाश आंबेडकर

दरम्यान, दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना लवकर परवाने मिळावेत म्हणून राज्य सरकारने एक खिडकी योजना सुरु केली आहे. “मंडप तसेच इतर परवानग्या लवकर मिळाव्यात म्हणून एक खिडकी योजना तसेच ऑनलाईन पद्धतीने सर्व परवानग्या देण्यात याव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोठेही क्लिष्ट अटी नकोत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. गणेश मंडळांकडून नोंदणी शुल्क घेण्यात येऊ नये, हमीपत्रदेखील घेऊ नका, असे पोलिसांना सांगण्यात आले आहे. हा उत्सव साजरा करताना नियमांचा बागुलबुवा नको, असेदेखील अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मुंबईतील नियमावली राज्यभर लागू असेल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी सांगितले आहे.

Story img Loader