बाबरी पाडली तेव्हा कुठे होता? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना केला आहे. भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता. पाटलांच्या या दाव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पाटलांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले की, “अयोध्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक घडामोडीत हिंदुत्वाची मशाल पेटती राहावी यासाठी बाळासाहेबांनी केलेला संघर्ष आणि त्याग या देशाला माहिती आहे. त्याच त्यागातून आजचा भाजपा निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरे बाबरी कांडानंतर लखनौला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर झाले आहेत. त्यातले ते प्रमुख आरोपी आहेत. हे भाजपाच्या नेत्यांना माहिती नाही का? ज्यांना (एकनाथ शिंदे) त्यांनी विकत घेतलंय, त्यांच्या तोंडाला कुलूप का लागलंय?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील याप्रकरणी पत्रकार परिषद घेणार आहेत.

हे ही वाचा >> “…तर तुमची गुणपत्रिका नापासचीच येणार!” सुधीर मुनगंटीवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसला टोला, म्हणाले “राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी…”

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. शिंदे म्हणाले की, त्यांना (उद्धव ठाकरे आणि संजय राऊत) बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी त्यांचा नैतिक अधिकार गमावला आहे. तसेच बाबरी मशिद पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते? असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली असल्याचंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde asked to uddhav thackeray where were you when babri masjid demolished asc