केंद्र सरकारने कांद्यावर भरमसाट निर्यातशुल्क लादलं आहे. यानंतर शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या. अशातच २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पण, किमान ४ हजार प्रतिक्विंटलचा भाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा शरद पवारांनी ४ हजार रूपयांचा भाव देण्याची मागणी केल्याबाबत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला. त्यावरून एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांसमोरच शरद पवारांना लक्ष्य केलं.

“राज्य सरकारही मागे राहणार नाही”

एकनाथ शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पहिल्यांदाच केंद्र सरकारने हस्तक्षेप करत २ लाख मेट्रिक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये राज्य सरकारही मागे राहणार नाही.”

हेही वाचा : ऐश्वर्या रायबद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य गावितांना भोवणार? महिला आयोगाने बजावली नोटीस; रूपाली चाकणकर म्हणाल्या…

“राजकारण करू नये”

“शरद पवार मोठे नेते आहेत. ते दहा वर्ष कृषीमंत्री होते. त्यावेळीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, संकटकाळात कांद्याबाबत असा निर्णय घेतला नाही. जेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट आलं, तेव्हा पंतप्रधान मोदी पाठिशी उभे राहिले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. त्यामुळे यात राजकारण करू नये,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “आमच्याकडून संग्राम थोपटेंवर अन्याय झाल्यासारखं वाटतं, पण…”, काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान

“निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे”

“साखर उद्योगासाठी केंद्र सरकारने दहा हजार कोटींची कर सवलत देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचं निर्णय घेतले जातात, तेव्हा याचं स्वागत केलं पाहिजे. ना की राजकारण केलं पाहिजे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Story img Loader