जून २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना बरोबर घेत पक्षाविरोधात दंड थोपटले. या आमदारांना विश्वासात घेऊन शिंदे यांनी वेगळा गट बनवला. या गटाने भाजपाबरोबर राज्यात सत्तास्थापन केली. तसेच एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पाठोपाठ शिंदेंच्या गटाने मूळ शिवसेना पक्षावर दावा केला आणि निवडणूक आयोगाने शिंदेंच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. तसेच पक्षाचं अधिकृत चिन्हदेखील त्यांनाच बहाल केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. एकनाथ शिंदे बंडखोरी करून सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. दरम्यान, ते आणि त्यांच्याबरोबरचे आमदार सुरतमध्ये असताना नेमकं काय घडलं होतं. पडद्यामागे कोणत्या हालचाली केल्या जात होत्या यावर शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा