Eknath Shinde on Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मोठा विजय मिळाला. त्यानंतर दोन आठवड्यांनी महायुतीने राज्यात सत्तास्थापन केली आहे. ५ डिसेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील अनेक नेते शपथविधीला हजर राहिले नाहीत. दरम्यान, आता उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू असून सर्व आमदार नागपुरात आहेत. उद्धव ठाकरे हे देखील या अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. दरम्यान, त्यांनी विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं शिवसेनेकडून (ठाकरे) स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाष्य केलं आहे. “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंमध्ये बदल झालेला दिसतोय”, असं शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी नागपुरात काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “खूप चांगली गोष्ट आहे की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले. सगळे विरोधक सत्ताधाऱ्यांना भेटतात. मुख्यमंत्री देखील प्रत्येकाला भेट देतात. हे चित्र पाहिलं की काही दिवसांपूर्वी टोकाची टीका करणारे, देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करणारे, सत्ता आल्यावर तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे, सरकार आल्यावर तुम्हाला तुरुंगात टाकू असं म्हणणारे २०१९-२० मध्ये त्यांचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविरोधात कटकारस्थान करणारे, कारस्थान रचून आम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणारे आता काय करतायत ते बघा”.

Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
cm devendra fadnavis mns chief raj thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”
abhijeet kelkar post for CM devendra Fadnavis
“एक दिवस असाही येईल, जेव्हा देवेंद्रजी आपल्या देशाचे…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट; तर प्रवीण तरडे म्हणाले…
Shivsena UBT Leader Vinayak Raut Criticized Ekanth Shinde
Vinayak Raut : “महायुतीत एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे, गरज असेल तर..”; ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याची टीका
Eknath Shinde Amit Shah Meeting
“किमान सहा महिने तरी मुख्यमंत्रीपद द्या”, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे मागणी; दिल्लीत काय चर्चा झाली?
uddhave thackeray gears up for bmc polls tells party workers to take hindutva agenda
हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा; उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांना आदेश

एकनाथ शिंदेंची शेलक्या शब्दांत टीका

एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांची कारस्थानं जगजाहीर आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना जे काही यश मिळालं, त्या यशानंतर हे लोक हुरळून गेले. यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळेल असं ठरवून टाकलं होतं. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचं वाटप देखील करून टाकलं होतं. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्यात (उद्धव ठाकरे) अमुलाग्र बदल झालेले दिसत आहेत. हे चित्र (भेटीचं) चांगलं आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी आजी मुख्यमंत्र्यांना भेटणं यात काही गैर नाही. मात्र आज याला भेट, त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी ही स्थिती आहे”.

हे ही वाचा >> नाराज भुजबळांची पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा, पुढची योजना ठरली? स्वतः माहिती देत म्हणाले…

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, “विधिमंडळाचं सभागृह हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. सभागृहाबाहेर नौटंकी करण्यासाठी नव्हे. तिथे पायऱ्यांवर बसून नौटंकी केली जाते. यातच त्यांना समाधान वाटतं. मात्र ते करण्याऐवजी त्यांनी सभागृहात येऊन लोकांचे प्रश्न मांडावे. आता हिवाळी अधिवेशन विदर्भात चालू आहे तर विरोधकांनी विदर्भाच्या लोकांसाठी भांडावं”.

Story img Loader