Eknath Shinde on Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मोठा विजय मिळाला. त्यानंतर दोन आठवड्यांनी महायुतीने राज्यात सत्तास्थापन केली आहे. ५ डिसेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील अनेक नेते शपथविधीला हजर राहिले नाहीत. दरम्यान, आता उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू असून सर्व आमदार नागपुरात आहेत. उद्धव ठाकरे हे देखील या अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. दरम्यान, त्यांनी विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं शिवसेनेकडून (ठाकरे) स्पष्ट करण्यात आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा