सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून विधिमंडळात वेगवेगळी विधेयके मांडली जात आहेत. या विधेयकांवर सभागृहात चर्चा होत असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांकडून सरकारवर वेगवेगळ्या माध्यमातून टीका केली जात आहे. विधिमंडळ इमारतीच्या पायरीवर उभे राहून विरोधक सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. आम्ही बहुमताच्या जोरावर कुठलेही काम करणार नाही. पण विरोधक बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत, असे शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> “आता निवडणुका होऊ शकत नाहीत” ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर देवेंद्र फडणवीसांचे विधान

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sanjay Shirsat On Mahayuti Cabinet Politics :
Sanjay Shirsat : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “मंत्रिपदे देताना…”
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”
eknath shinde look extreme tiredness during maharashtra cm oath taking ceremony
थकलेल्या देहबोलीला सावरण्याचे आव्हान; झगमगाटातही शिंदेंच्या अस्वस्थतेची चर्चा
devendra fadnavis takes oath as chief minister of maharashtra for the third time
तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी
DCM Eknath Shinde first Reaction
Eknath Shinde: “आधी मी CM म्हणजेच ‘कॉमन मॅन’ होतो, आता DCM…”, शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
Eknath Shinde Name is not on CM Oath Ceremony Invitation Card
Uday Samant: ‘तीनही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचे नावच नाही’, तर उपमुख्यमंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचा इशारा; म्हणाले, “शिंदेंना डावलून…”

सभागृहात बोलताना, “जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले आहेत. विरोधी पक्षाचा मान ठेवून आम्ही बहुमताच्या जोरावर कुठलेही काम करणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी ठरवले आहे. असे असले तरी विरोध केला जात आहे. ‘ताट वाटी चलो गुवाहाटी’ अशा घोषणा परवा दिल्या गेल्या. जोरात घोषणा दिल्या जात होत्या. बेंबीच्या देठापासून ओरडत होते,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदेंच्या खात्याचे निर्णय वरुण सरदेसाई घ्यायचे”; नितेश राणे यांचा दावा

पुढे बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. “घसा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले. मला तुमचा प्रवास माहिती आहे ना. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम, दया, करुणा दाखवली. मात्र परत परत दाखवता येणार नाही. मी कमी बोलतो,” अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली.

हेही वाचा >>> “जरा दमानं घ्या, मी नवीन प्लेअर, तुम्ही सगळे….; विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देताना मंगलप्रभात लोढांची दमछाक

दरम्यान, आज (२२ ऑगस्ट) सभागृहात नगर परिषद अध्यक्ष तसेच सरपंचांची निवड थेट जनतेतून व्हावी, यासंबंधीच्या विधेयकवर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान धनंजय मुंडे यांनीदेखील तुफान भाषण करत शिंदे यांना लक्ष्य केलं. “महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो, हे दुर्दैव आहे. राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये, अशी कोपरखळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली.

Story img Loader