निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे संकेत दिले आहेत. तसेच शिंदे गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले असले तरी चोर हा चोरच असतो. आमच्याकडेच खरे धनुष्यबाण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा >>> “सूड ही दुधारी तलवार, आज तुमच्या हातात, उद्या…”, संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; म्हणाले, “रामाचा धनुष्यबाण रावणाला…”
“उद्धव ठाकरेंकडून सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था या स्वतंत्र यंत्रणा आहेत. या संस्थांवर अशा प्रकारचा आरोप केला जात नाही. यापुढेतरी तुमच्यात सुधारणा घडू द्या,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा >>> शिवसेना पक्ष, धनुष्यबाण शिंदे गटाला, निवडणूक आगोयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “चोर…”
“कोणीतरी आम्हाला चोर म्हणालं. म्हणजे आम्ही ५० आमदार चोर १३ खासदार चोर, शेकडो-हजारो नगरसेवक चोर, लाखो कार्यकर्ते शिवसैनिक चोर. म्हणजे तुम्ही लाखो लोकांना चोर ठरवत आहात. कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच तुम्हाला सोडून गेलेले गुन्हेगार आणि तुम्ही बरोबर? हे कसे होऊ शकेल. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे,” असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
हेही वाचा >>> शिवसेना पक्ष, धनुष्यबाण शिंदे गटाला, आता पुढची रणनीती काय? उद्धव ठाकरे म्हणाले “आता आम्ही…”
“आमच्यासोबत ५० आमदार आहोत. १८ पैकी १३ खासदार आमच्यासोबत आहेत. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची गणना केली तर बहुमत आमच्याकडे आहे. मग ते कशासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतले आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “…तरी तो मर्द होऊ शकत नाही”
“हा निर्णय बहुमताच्या आधावर घेतला आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यांना आरोप करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांनी आरोप करायचा असेल तर करावा,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.