Eknath Shinde Dasara Melava 2022: शिंदे गटाच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यात आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “कुणाकडे फोन असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करा आणि त्यांना दोन मिनिटे येथे येऊन बघून जायला सांगा. मग खरी शिवसेना कोणती हे त्यांना कळेल”, असा शाब्दिक हल्ला या मेळाव्यात बापूंनी उद्धव ठाकरेंवर चढवला. खरी शिवसेना कुणाची? याबाबत उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद रंगला आहे. या वादाचा पुढचा अंक आज शिंदे गटाच्या मेळाव्यात पाहायला मिळाला आहे.

Dasara Melava 2022: मेळाव्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री शिंदेंचं Tweet; मराठी, हिंदुत्वाचा उल्लेख करत म्हणाले, “आपण…”

दरम्यान, मेळाव्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या गाण्यातून शिंदे गटाने महाविकासआघाडीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेवरून आणि दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरून महाविकासआघाडीच्या नेत्यांवर या गाण्यात सडकून टीका करण्यात आली आहे. “कुणी केली गद्दारी, तुम्हीच केली गद्दारी” या गाण्यातून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

“उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाच्या विचाराचे एक घाव…”; शहाजी बापू पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचा विचार…”

“यंदाच्या दसऱ्याला चाळीस गद्दार आणि फितुरांना गाडण्याचा निर्धार केला जाणार आहे. निष्ठेची वज्रमूठच घट्ट आवळली जाणार आहे. एक घाव दोन तुकडे, आज हिशेब चुकता होणार आहे”, अशी टीका ‘सामना’तून शिंदे गटावर करण्यात आली आहे. या टीकेवर शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाच्या विचाराचे एक घाव दोन तुकडे केले आहेत. राजकारणात आता दोन गट पडले असले तरी, मनाची आणि विचारांची विभागवारी अडीच वर्षापूर्वीच झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसह जात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची अंमलबजावणी केली का?,” असा सवाल शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित केला आहे.