Eknath Shinde Dasara Melava 2023 Updates in Marathi : शिवसेना संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ३० ऑक्टोबर १९६६ साली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कात आयोजित केला होता. या पहिल्याच दसरा मेळाव्यात अभूतपूर्व गर्दी लोटली होती. विचारांचं सोनं लुटण्याकरता आणि शिवसेनेच्या वर्षभराच्या कार्यक्रमाची रुपरेषा जाणून घेण्याकरता शिवसैनिक शिवाजी पार्कवर येत असत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा सुरू ठेवली. परंतु, गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेनेत बंडखोरी झाली. परिणामी शिवसेना दोन गटात विभागली गेली. विभागलेल्या दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर हक्क दाखवला. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्याच्या परवानगीचं प्रकरण थेट उच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं. परंतु, यंदा शिंदे गटाने संभाव्य वाद टाळत त्यांचा मेळावा आझाद मैदान येथे आयोजित करण्याचं ठरवलं आहे. पुढच्या काहीच तासांत आझाद मैदानातून एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार आहे. त्यांच्या या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, विरोधकांवर केलेली टीका, शिंदे गटातील विविध नेते-पदाधिकाऱ्यांचं संभाषण जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा