Eknath Shinde : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी भिवंडीतील काल्हेर या ठिकाणी असलेल्या आकृती रुग्णालयात प्रकृती बिघडल्याने दाखल झाला आहे. क्रिकेटपटू विनोद कांबळीला एकनाथ शिंदेंनी मदत जाहीर केली आहे. तसंच श्रीकांत शिंदे हे लवकरच विनोद कांबळीची भेट घेणार आहेत.

विनोद कांबळी आकृती रुग्णालयात

भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे ( भिवंडी ) येथील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन विनोद कांबळीची चौकशी केली. तसंच आकृती रुग्णलायच्या डॉक्टरांशीचर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती केली.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Lawyer charter suspended , Police Patil, Lawyer Police Patil, Lawyer,
पोलीस पाटील पदावर काम केल्यामुळे वकिलाची सनद निलंबित

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे लवकरच विनोद कांबळीला भेटणार

क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची सध्याची परिस्थिती पाहता कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांस वैयक्तिक ५ लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केलं आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पुढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितले. राज्याचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळीने कृतज्ञता व्यक्त केली तसेच हॉस्पिटलमध्ये भेटण्याची विनंती केली. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत.

हे पण वाचा- Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”

विनोद कांबळी कोणात्या आजाराशी झुंज देतोय?

रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी दिसल्या. आता मंगळवारी त्याच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येणार आहेत. डॉ. त्रिवेदी यांनी असेही उघड केले की रुग्णालयाचे प्रभारी डॉ. एस सिंग यांनी कांबळीला आयुष्यभर मोफत उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे. विनोद कांबळी यांची प्रकृती आता ठीक असल्याचं समोर आलं. तसेच विनोद कांबळींच्या मूत्राशयाला संसर्ग झाला असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉ. शैलेश सिंह ठाकूर यांनी दिली.

विनोद कांबळीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल

विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो सचिन तेंडुलकरशी बोलताना दिसला. रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी सचिन आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. दोघेही एकाच मंचावर होते. मात्र ज्या मैदानावर विनोदची बॅट तळपायची त्या ठिकाणी त्याला व्हिल चेअरवर आलेलं पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.विनोदचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक माजी भारतीय खेळाडू त्याच्या मदतीसाठी पुढे आले होते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही विनोद कांबळीला पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

Story img Loader