Eknath Shinde Meeting with Amit Shah in Delhi Over Maharashtra Chief Minister Post : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १० दिवस उलटले तरी अद्याप राज्याला नवं सरकार लाभलेलं नाही. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असून महायुतीने राज्यात तब्बल २३५ जागा जिंकल्या आहेत. मात्र महायुती अद्याप सरकार स्थापन करू शकलेली नाही. महायुतीत काही दिवस मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळालं. पाठोपाठ आता गृहमंत्रीपदावरून गोंधळ चालू आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्त्व करण्याची इच्छा होती. मात्र, भाजपाकडून नकार मिळाल्यानंतर शिंदे यांनी स्पष्ट केलं की भाजपा पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्रीपदासाठी ज्या नेत्याचं नाव जाहीर करतील मी त्याला पूर्ण पाठिंबा देईन. मात्र, शिंदे आता महायुतीच्या सरकारमध्ये ग़ृहमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. गृहमंत्रीपदामुळेच महायुतीच्या चर्चा लांबल्या असून शपथविधी रखडल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद व खातेवाटपासंदर्भातील चर्चेसाठी एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भाजपाकडे किमान सुरुवातीचे सहा महिने मुख्यमंत्रीपद दिलं जावं अशी मागणी केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा