Maharashtra Cabinet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची काल रात्री (८ जुलै) भेट घेतली. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच खातेवाटपावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारला केंद्राचा पाठिंबा तसेच सहकार्य मिळावे यासाठी ही सदिच्छा भेट असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या भेटीत मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी अमित शाह यांना विठ्ठल रखुमाईची खास मूर्ती भेट दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>> Amarnath Shrine Cloudburst : अमरनाथमध्ये पवित्र गुहा परिसरात ढगफुटी, ८ जणांचा मृत्यू

राज्यात शिंदे गट- भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला किती मंत्रिपदे मिळणार आणि भाजपाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. याच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचीदेखील भेट घेणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला खास महत्त्व आले आहे.

हेही वाचा >>>> “…तर आम्हाला सत्तेची पर्वा नाही,” शिंदे गटातील आमदाराचा भाजपाला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपाला २५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तर १३ मंत्री हे एकनाथ शिंदे गटाचे असू शकतात. भाजपा पक्षाकडून बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे खातेवाटप केले जाऊ शकते. असे असताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी गेल्यामुळे शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांचा समावेश असेल? भाजपाला कोणती खाती दिली जातील? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde devendra fadnavis meet amit shah to discuss maharashtra cabinet expansion prd