Ajit Pawar meeting with Amit Shah: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी काही दिवसांपासून सर्व बैठका रद्द केल्या होत्या. गेल्या तीन चार दिवसांपासून ते आराम करत आहेत. दुसऱ्या बाजूला महायुतीमधील घटक पक्ष असेलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र सत्तास्थापनेच्या आधी मंत्रिपदे मिळविण्यासाठी हालचाल सुरू केल्याचे दिसते. सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित पवार हे दिल्लीत पोहोचले. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात होते, मात्र अमित शाह चंदीगड दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची भेट झालेली नाही. आज सायंकाळी कदाचित भेट होऊ शकते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवारांकडून गृहनिर्माण खात्याची मागणी झाल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
Register to Read
Ajit Pawar: शिंदेंची नाराजी अजित पवारांच्या पथ्यावर? अजित पवारांचा दिल्ली दौरा, ‘या’ खात्यावर केला दावा
Ajit Pawar meeting with Amit Shah: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आधी मुख्यमंत्री आणि त्यानंतर गृहमंत्री तसेच इतर मंत्रिपदासाठी आग्रही असताना अजित पवार सोमवारी अचानक अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-12-2024 at 08:48 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSअजित पवारAjit Pawarअमित शाहAmit Shahमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politicsविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde disappears again ncp leader ajit pawar reaches delhi to meet amit shah to discuss portfolio claim on housing department kvg