समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या दरम्यानचा पहिला टप्पा मेपर्यंत सुरू करण्याचे संकेत नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. शिंदे रविवारी नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले, समृद्धी मार्गाची पाहणी करायला आलो आहे. या द्रूतगती मार्गाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मे महिन्यात पहिला टप्पा सुरू करण्याचा मानस आहे, असे शिंदे म्हणाले. यावेळी शिंदे यांनी स्वत: १३७ किमी प्रती तास वेगाने या महामार्गावरुन गाडी चालवली. त्यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केलीय. मात्र या पोस्टवर अनेकांनी वेग मर्यादा लावण्यात येते यावर आक्षेप घेतलाय. तर दुसरीकडे कोकणवासियांनी थेट शिंदे यांना चॅलेंज केलंय.
नक्की वाचा >> “लगेच याचा अर्थ लावू नका की अजित पवार बाहेर पडणार आहेत आणि भाजपा…”; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची जबाबदारी जेव्हा माझ्या खांद्यावर आली, तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या विकासातील हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक शिवधनुष्य हाती घेण्याइतकेच आव्हानात्मक वाटत होते. परंतु सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी समाजोपयोगी, विकासात्मक काम करण्याची माझी कायम मनिषा होती. यातील एक भाग म्हणून मी नेहमी या प्रकल्पाकडे पहातो आणि तो यशस्वीपणे उभारणे हे माझे उद्दिष्ट आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या पहाणी दौऱ्यादरम्यान आज खास आग्रहास्तव बऱ्याच वर्षांनी चारचाकी वाहनाचे सारथ्य करण्याची संधी मिळाली. इलेक्ट्रिक कार या महामार्गाच्या पूर्ण झालेल्या रस्त्यावरून चालवत असताना भविष्यात बदलणाऱ्या समृध्द महाराष्ट्राचे चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले आणि कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने मन सुखावले,” अशी पोस्ट एकनाथ शिंदेंनी केलीय.
नक्की वाचा >> “देवाच्या चरणी तरी…” म्हणत शिवसेनेकडून फडणवीसांना २०२९ च्या तयारीचा सल्ला; सोमय्या, राणेंवरही टीका
मात्र या पोस्टवर आलेल्या अनेक कमेंट्समध्ये चांगले रस्ते बांधायचे आणि वेगमर्यादा लावून दंड आकारायचा असं म्हणत नाराजी व्यक्त केलीय. तर काहींनी यांना एवढ्या वेगाने जाऊ दिलं आम्हाला नक्कीच अडवणार आणि दंड आकारणार असं म्हणत पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील दंडाबद्दल आक्षेपण घेतलाय.
नक्की वाचा >> कोल्हापूर पोटनिवडणूक: मोदींच्या नावे लोक BJP ला मतं देतील असा चंद्रकांत पाटलांना विश्वास; म्हणाले, “मोदी माणसांच्या…”
“महामार्ग चांगला बनवला आहे म्हणून तुम्ही गाडी १४० च्या वेगाने चावली. नंतर वेगमर्यादा ८० ठेवणार आणि सामान्यांकडून दंड वसुली करणार, जशी मुंबई पुणे महामार्गाच्या माध्यमातून सुरु आहे,” असं दिलीप दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच आपण स्वत: एक शिवसैनिक असल्याचंही नमूद केलंय. प्रशांत गायकवाड यांनी साहेब छान आपण १२० च्या वेगाने गाडी चालवत आहात पण आम्हाला ८० पुढे दंड करतात कॅमेरे, असं म्हटलंय.
यांना १३० च्या वर चालवायची परवानगी आहे. आम्हाला इ-चलान येतं ११० वर असं राजेंद्र पार्कले यांनी म्हटलंय.
कोकणवासियांनी दिलं चॅलेज
एकीकडे वेग मर्यादेवरुन आक्षेप घेतला जात असतानाच दुसरीकडे अशाप्रकारे तुम्ही मुंबई-गोवा हायवेवर गाडी चालवू दाखवा असं थेट आव्हान शिंदे यांना कोकणातील अनेक लोकांनी दिलंय. शिंदेंच्या पोस्टवर कोकणातील अनेकांची असाप्रकारच्या कमेंट्स आहेत. अनेकांनी शिंदेंना कोकणात यायला मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टर लागतं यावरुनच येथील रस्त्यांची दुर्दशा समजते असा टोला लागावला आहे.
नक्की वाचा >> “किरीट सोमय्या भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
अतुल चव्हाण यांनी, “एवढी हिंमत कोकणातल्या रस्त्यांवर गाडी चालवून दाखवा ना. तिकडे हेलिकॉप्टरने प्रवास करता. मुख्यमंत्री मुंबई ते पंढरपूर गाडी चालवत जातात सात ते आठ तास पण महाडला जायला त्यांना हेलिकॉप्टर लागतं,” असं म्हटलंय. तर, “मुंबई, गोवा महामार्गावर पण याच स्पीडने गाडी चालवून दाखवा साहेब, खूप आनंद होईल. असे आपण अजून १५ वर्ष जरी मुंबई गोवा हायवे नाही झाला तरी कोकणीच जनता तुम्हालाच मतदान करणार त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करु नका,” असा टोला एकाने लगावला आहे.
या व्हिडीओवरुन शिंदेंवर टीका होत असली तरी मुंबई-गोवा मार्गाचं विस्तार आणि काम मागील अनेक वर्षांपासून रडलंय असं अनेकदा कोकणामध्ये ये-जा करणारे प्रवासी सांगतात. दर गणेशोत्सवाला या मार्गाने जाणाऱ्यांचे प्रचंड हाल होतात. अनेकदा या मार्गावर अनेक किलोमीटर्सपर्यंत वाहतूककोंडीही पहायला मिळते.
वन्यप्रण्यांसाठी विशेष सोय
वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगाव जवळ वन्यप्राण्यांच्या आवागमणासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलाची पाहणी एकनाथ शिंदे यांनी काल केली. या महामार्गाचे वैशिष्ट्य असलेल्या वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विषेश काळजी घेण्यात आलेली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खास ८ ओव्हरपास आणि ७६ अंडरपास तयार करण्यात आले आहेत. या ओव्हरपासच्या कामांची एकनाथ शिंदेंनी पहाणी केली. वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बॅरीयर्स बसवण्यात येणार असून आनंदाची बाब म्हणजे या ओव्हरपास वरून वन्यजीवांनी ये-जा करण्यास सुरूवात केली आहे.
नक्की वाचा >> “मला उद्धव ठाकरेंची कुंडली पहायची आहे, काय भाग्यवान…”; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
कसा आहे वर्ध्यातील हा पट्टा?
मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गाची वर्धा जिल्ह्यातील लांबी ५८ किलोमीटर इतकी आहे. जिल्ह्यातील मार्ग पूर्ण बांधून झाला आहे. रस्त्याची रुंदी १२० मीटर असून तो सहापदरी आहे. वर्धा, सेलु आणि आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून एकून ७८२ हेक्टर इतकी जमीन महामार्गासाठी संपादीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात या मार्गावर २ हजार ७६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात या मार्गावर विनाअडथडा वाहतुकीसाठी ५ मोठे, २७ लहान पुलांसह ९ उड्डाणपूल बांधण्यात आले आहे. येळाकेळी व विरूळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांच्या आवागमणासाठी दोन विशेष उड्डानपुले बांधण्यात आले आहे. हा मार्ग विदर्भातील जनतेसाठी फायद्याचा ठरणारा आहे.