लोकसभा निवडणूक पार पडून एक आठवडा उलटला आहे. या निवडणुकीच्या प्रचारकाळात भाजपाने दावा केला होता की, ते ४०० जागा जिंकतील. मात्र भाजपा आणि एनडीएतील सर्व पक्ष मिळून ३०० जागा देखील जिंकू शकले नाहीत. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपा आणि एनडीएची पिछेहाट झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीसमोर महायुतीला (एनडीए) फारसं यश मिळालं नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने ३१ तर महायुतीने १७ जागा जिंकल्या. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला महाराष्ट्रात केवळ नऊ जागा जिंकता आल्या. तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले. महायुतीच्या या पराभवाचं प्रत्येकजण आपापल्या परिने विश्लेषण करत आहेत. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख तथा महायुतीचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनीदेखील महायुतीच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत.
“नाशकात कांद्याने रडवलं, विदर्भ-मराठवाड्यात…”, एकनाथ शिंदेंनी सांगितली लोकसभेतील अपयशाची चार कारणं
एकनाथ शिंदे म्हणाले, “गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली आहेत. आम्ही त्यांचं गेल्या १० वर्षांमधील काम पाहिलं आहे.
Written by अक्षय चोरगे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-06-2024 at 19:58 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSएकनाथ शिंदेEknath ShindeएनडीएNDAनरेंद्र मोदीNarendra ModiमहायुतीMahayutiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde explained reasons for nda failure in lok sabha election 2024 asc