कल्याण पश्चिम मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून वादग्रस्त विधान केलं आहे. कुठल्यातरी एक-दोन मुलींनी लव्ह जिहादला बळी पडून आपला धर्म बदलला आहे. त्या त्यांच्याबरोबर (मुस्लीम तरुणांबरोबर) पळूनही गेल्या आहेत. त्यामुळे त्याची जमातच नष्ट करून टाकू, अशा अर्थाचं विधान विश्वनाथ भोईर यांनी केलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेला व्हिडीओ १ ऑगस्ट रोजीचा असून आगरी सेनेच्या ३७ व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमातच शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. लव्ह जिहाद हा आगरी-कोळी समजाच्या दाराजवळ आलाय. हा मुद्दा मी सभागृहात मांडणार होतो. सभागृहात मी अबू आझमींसह इतर चार-पाच लोकांना थेट सांगणार होतो की, यांची जमातच नष्ट करून टाकू, असं विधान भोईर यांनी केलं. त्यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

हेही वाचा- भर बैठकीत अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा; थेट अंगावर गेले धावून, नेमकं कारण काय?

यावेळी विश्वनाथ भोईर म्हणाले, “लव्ह जिहाद हा आगरी-कोळी समाजाच्या दाराजवळ आलाय. एकदम दाराजवळ आलाय. दाराजवळ नाही तर घरात घुसलाय. कुठल्यातरी एक-दोन मुलींनी लव्ह जिहादला बळी पडून आपला धर्मसुद्धा बदललाय. त्या त्यांच्याबरोबर पळूनही गेल्या आहेत. इथे कुणी फेसबूक किंवा व्हॉट्सअॅप वापरत असाल तर त्यांनी ते ऐकलं असेल. सभागृहात बोलण्याचा माझा विषयही तोच होता. सभागृहात अबू आझमी आणि अजून चार-पाच लोक आहेत. त्यांना सरळ सांगणार होतो. यांची जमातच नष्ट करून टाकू.”

हेही वाचा- “भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नसलेल्या RSSच्या कुशीत भाजपाचा जन्म”, नाना पटोलेंची टीका

विश्वनाथ भोईर पुढे म्हणाले की, भिवंडी आणि कल्याणमध्ये दंगल घडली तर सगळ्यात आधी गाववाले उभे राहायचे. आगरी कोळी उभा राहायचा. तेव्हा आपण यांची हवा टाईट करायचो. भिवंडी आणि कल्याणची दंगलही आगरी-कोळी सांभाळायचा. आता जर हे आमच्याच मुलींना जाळ्यात अडकवत असतील तर त्यांना संपवून टाकू, अशा भाषेत मी बोलणार होतो. मग मला सभागृहातून बाहेर काढलं असतं तरी चाललं असतं. मला पक्षातून काढून टाकलं असतं तरी चाललं असतं. यासाठी माझी तयारी होती.