Eknath Shinde Futur if Ajit Pawar Gets Finance Portfolio: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यात अनेक राजकीय समीकरणं नव्याने प्रस्थापित होण्याच्या दिशेने जात असल्याचं दर्शवत आहेत. एकीकडे भाजपाला अभूतपूर्व असं यश मिळालं असून महायुतीला तब्बल २३५ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी अवघ्या ४९ जागांवर आटोपली आहे. त्यामुळे मविआतील तिन्ही घटकपक्षांना या निकालांचा सर्वार्थाने विचार करण्याची वेळ आली आहे. मात्र, मविआबरोबरच महायुतीमध्ये भाजपाव्यतिरिक्तच्या दोन्ही पक्षांबाबतही फारशी समाधानकारक स्थिती नसल्याचं विश्लेषण ‘लोकसत्ता’च्या चर्चासत्रातून समोर आलं आहे. विशेषत: एकनाथ शिंदेंची अवस्था उद्धव ठाकरेंबरोबर सत्तेत असताना जशी होती, तशीच आता होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘लोकसत्ता’च्या चर्चासत्रात संपादक गिरीश कुबेर यांच्यासह राजकीय विश्लेषक संजीव साबडे व प्रकाश अकोलकर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक निकालांचं विश्लेषण करताना या सगळ्या प्रक्रियेत एकनाथ शिंदेंची झालेली कोंडी आणि आगामी काळात त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलेलं असू शकतं, याबाबत भाष्य केलं.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Ajit Pawar visits accident site decides to provide Rs 5 lakh assistance to families of deceased
अपघातस्थळी अजित पवार यांची भेट, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Ajit Pawar Statement About Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”
Dhananjay Munde. Ajit Pawar , Maratha Kranti Morcha,
धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची अजित पवारांकडे मागणी, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन
Eknath Shinde Shivsena Reaction on Raj Uddhav Meet
Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”
Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?

अशी झाली एकनाथ शिंदेंची कोंडी!

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी लागलीच भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा दर्शवल्यामुळे शिंदेंची कोंडी झाल्याचं विवेचन संजीव साबडे यांनी केलं. “ज्या क्षणी अजित पवारांनी पाठिंबा जाहीर केला त्याच क्षणी १३७ अधिक ४० असे १७७ आमदार जुळून आले. मग एकनाथ शिंदे सरकारसोबत गेले नाही तरीही सरकार स्थापन होऊच शकत होतं. त्यामुळे जर सोबत राहिलो तर काही फायदे तरी मिळतील अशा धोरणानुसार शिंदेंनी निर्णय घेतला असेल”, असं ते म्हणाले. त्यावर अकोलकर यांनीही दुजोरा देत “शिंदेंना भाजपामागे फरफटत जाण्याशिवाय दुसरा मार्ग राहिला नाही. शिंदेंनी असाही विचार केला असेल की मविआकडे जाऊन काही मिळेल का. पण त्यांना काही पर्यायच शिल्लक राहिला नाही़”, अशी भूमिका मांडली.

पुन्हा अजित पवारांशी स्पर्धा!

दरम्यान, यावेळी गिरीश कुबेर यांनी एकनाथ शिंदेंची अवस्था पुन्हा एकदा ठाकरे सरकारवेळी होती तशी होण्याची शक्यता वर्तवली. “एक शोकांतिका आहे यात. भाजपाचा मुख्यमंत्री निश्चित आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर अजित पवार उपमुख्यमंत्री होणार हेही जवळपास निश्चित आहे. त्यापुढे जाऊन जर अजित पवारांना आत्ताही अर्थमंत्रीपदच दिलं, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे ज्या नाराजीनं बाहेर पडले, तीच परिस्थिती आत्ताही ओढवू शकते. तेव्हा अजित पवार अर्थमंत्री होते आणि सगळा निधी स्वत: नियंत्रित करायचे, मुख्यमंत्री असताना शिंदे अजित पवारांना बाजूला ठेवू शकत होते. पण आता ती संधीही नाहीये”, असं विश्लेषण त्यांनी केलं.

पाहा मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ

“एकनाथ शिंदेंना धोका किंवा आव्हान हे भाजपाचं नाहीये. ते अजित पवारांचं आहे. अजित पवारांनी शिंदेंच्या आधी पाठिंबा जाहीर केला. शिंदेंना गृहमंत्रीपद मिळणार नाही. त्यांना नगरविकास किंवा इतर खाती येऊ शकतात. अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद गेलं तर अजित पवार निधीबाबत वेगळं धोरण घेऊ शकतात”, असं ते म्हणाले.

Eknath Shinde: ‘भाजपाने प्रेमाने गळ्यात घातलेला हात हळूहळू गळफास होतो’, एकनाथ शिंदेंचं असंच होईल का?

भाजपाची नजर पालिका निवडणुकांवर

दरम्यान, भाजपाला पालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंची गरज असेल, अशी भूमिका प्रकाश अकोलकर यांनी मांडली. “मुंबई पालिका निवडणुकीच्या काळात भाजपा शिंदेंना वापरून घेणार. मागे युतीचं सरकार असताना फडणवीस उद्धव ठाकरेंविरोधात मुंबई पालिका निवडणुकीत लढले होते. वॉर्डात जाऊन वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा बोलत होते. ते ८२-८४ पर्यंत पोहोचलेही होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी मनसेचे काही आमदार फोडून स्वत:सोबत घेतले होते. तेव्हा ठाकरेंबरोबर शिंदेंसारखे लढाऊ वृत्तीचे शिलेदार होते. आता शिवसेनेचा राजकीय सहकार्यांचा वर्ग बदलला आहे”, असं समीकरण अकोलकर यांनी मांडलं.

Story img Loader