राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने आदित्य ठाकरेंवर पप्पू म्हणून टीका केली आहे. त्यावरून ठाकरे गटाकडूनही अब्दुल सत्तार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. आता आदित्य ठाकरे महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरा काढत असून येत्या ७ तारखेला ते अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात जाणार आहेत. खुद्द अब्दुल सत्तार यांनीच माध्यमांशी बोलताना तशी माहिती दिली असून तेव्हा कुणाच्या सभेला किती गर्दी होणार, हे कळेलच, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे सरकार पडलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिंदे गट आणि भाजपाचं नवीन सरकार राज्यात अस्तित्वात आलं. तेव्हापासून राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना पाहायला मिळत आहे. त्यात अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा पप्पू म्हणून उल्लेख केल्यामुळे दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचं जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना प्रसारमाध्यामांनी ठाकरे गटाच्या धोरणाविषयी विचारणा केली असता त्यावर अब्दुल सत्तारांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. ‘ठाकरे गटाकडून ४० बंडखोर आमदारांविरोधात मिशन ४० सुरू करण्यात आलंय’ अशी विचारणा पत्रकारांनी करताच अब्दुल सत्तार यांनी त्यावरून खोचक शब्दांत टोला लगावला.

अशोक गेहलोतही गुलाम नबी आझादांच्या मार्गावर? सचिन पायलट यांचं सूचक विधान, मोदींच्या ‘त्या’ विधानाचा दिला संदर्भ!

“कुणी कोणतंही मिशन चालू केलं, तरी मला वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रासाठी जे मिशन देतील, तेच अंतिम असेल. माझ्या मतदारसंघातही नंबर दोनचे पप्पू येणार आहेत. ते जेव्हा माझ्या मतदारसंघात येतील तेव्हा कोणाच्या सभेत किती गर्दी येईल ते दिसेल”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

Story img Loader