राज्यात सत्ताबदल झाल्यापासून गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शिंदे गट आणि ठाकरे गट हे शिवसेनेतील दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे राज्यातलं ठाकरे सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आत्तापर्यंत शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार एकनाथ शिंदेसह सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्याशिवाय इतर १० आमदारही त्यांच्यासह गेले असताना आता ठाकरे गटातले उरलेले सगळे आमदार शिंदे गटात येणार असल्याचं मोठं विधान आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.
संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. त्यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर परखड शब्दांत टीका केली. “जेव्हा शिदेंचा उठाव झाला, तेव्हा गुवाहाटीहून मी प्रतिक्रिया दिली होती की उद्धव ठाकरेंची दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळेच शिवसेना आज संपतीये. तेच प्रकार आज चालू आहेत. काय चालू आहे, कोण बोलतंय, कुणाबद्दल बोलतंय. पक्षाचं कुणाला देणं-घेणं आहे की नाही. स्वत:ची टिमकी वाजवण्यासाठी पक्षाचा वापर आजही चालू आहे. हे लोक कोण आहेत. ग्राऊंड लेव्हलला यांनी काम केलंय का? ग्राऊंड लेव्हलची निवडणूक कशी लढतात हे यांना माहिती आहे का?” असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.
“त्यांच्या उरल्या-सुरल्या आमदारांना विचारा की..”
“त्यांच्या पक्षातल्या उरल्या-सुरल्या आमदारांना विचारा तर खरं की ग्राऊंड लेव्हलला आपली काय परिस्थिती आहे. पण आपण कसं लाईमलाईटमध्ये येऊ, या पद्धतीने यांचं (संजय राऊत) सगळं चाललंय. हे पक्षासाठी घातक आहे. पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. तरी उद्धव ठाकरे का गप्प आहेत, हे मला माहिती नाही”, असंही संजय शिरसाट म्हणाले.
“…तरी उद्धव ठाकरे गप्प का आहेत?” शिंदे गटाचा सवाल; म्हणे, “…हे पक्षासाठी घातक आहे!”
दरम्यान, यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी ठाकरे गटातील आमदारांविषयी मोठं विधान केलं. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये ठाकरे गटातील उरलेले आमदारही शिंदे गटात येतील, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. “हा जो सकाळचा साडेनऊचा भोंगा चालतो, त्याला लोकही कंटाळले आहेत. आम्ही ग्राऊंड लेव्हलला काम करतो. पक्षातल्या ज्या आमदार, कार्यकर्त्यांना पुढे निवडणुका लढवायच्या आहेत, त्यांना माहिती आहे, की जर असेच बोंबलत बसले, तर ते निवडणूक लढवायच्याही मनस्थितीत राहणार नाहीत”, असं शिरसाट म्हणाले.
“आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत”
“आजच्या घडीला त्यांच्या पक्षातले उरले-सुरले आमदार म्हणत आहेत की आम्हाला आता पक्षात राहायचं नाही. पण आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. इतक्या लवकर नको. हळूहळू सर्वांना घेऊ. सर्वजण आले, तर त्यांना बिचाऱ्यांना बोंबलायला जागा पाहिजे ना. या आठ-दहा दिवसांत हे होईल”, असा दावा शिरसाट यांनी केला.