कोल्हापूर- सांगली या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांचा कटू अनुभव आमदार शहाजीबापू पाटील यांना शनिवारी आला. या मार्गावर प्रवास करीत असताना खड्डे आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे त्यांना रस्त्यातच अडकून पडावे लागले. शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान ‘काय झाडी, काय हाटेल’ म्हणणाऱ्या शहाजीबापूंना आता काय ते ट्रॅफिक म्हणण्याची वेळ आली आहे. याच कारणामुळे समाजमाध्यमात खुमासदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

हेही वाचा >>> अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे गंभीर आरोप

Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Butibori bridge case, Butibori bridge case,
नागपूर : बुटीबोरी पूलप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, साडेतीन वर्षांत पुलास तडे
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
car used for procession of notorious goon gudya kasbe after release from yerwada jail
‘आया मेरा भाई आया’ म्हणत गुंड कसबेची येरवड्यात वाहन फेरी; गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या रिल्सवर कडक कारवाई केव्हा?

रत्नागिरी-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेला कोल्हापूर-सांगली हा वर्दळीचा रस्ता आहे. दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या रस्त्याचे चौपदरीकरण केले जात आहे. मात्र रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळा आणि अलीकडच्या ढगफुटी सदृश पावसामुळे रस्त्याची पूर्ण वाताहत झाली असून त्यावरून आंदोलने होत आहेत.

हेही वाचा >>>राज्यातील माजी मंत्री हाती बांधणार शिवबंधन! शिंदे गटातील मंत्र्याला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक

एकीकडे नागरिकांकडून आंदोलन केले जात असताना हा रस्ता किती खराब आहे याचा अनुभव आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनाही आला. सांगलीहून कोल्हापूरकडे जात असताना ते हातकणंगलेजवळ वाहतूक कोंडीत अडकले. येथे एका रस्त्यावर लांबलचक आणि खोलवर खड्डा पडला आहे. परिणामी येथून कासवगतीने वाहतूक होत आहे.

हेही वाचा >>> नितेश राणेंच्या ‘आईसक्रीम कोन’च्या विधानावर ठाकरे गटातील महिला नेत्या आक्रमक; म्हणाल्या “तुम्ही नागरिक म्हणून…”

वाहतूक नियंत्रण करण्यासाठी एकच पोलीस असल्यामुळे येथे आज केविलवाणे चित्र पाहायला मिळाले. याच वाहतूक कोंडीत शहाजीबापूही अडकून पडले. आमदार अडकून पडल्याचे समजल्यावर पोलिसांचीही एकच धावळ उडाली. शहाजीबापू जवळपास तासभर वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. याच कारणामुळे काय झाडी, काय डोंगार असे म्हणणारे शहाजीबापू ‘काय ते ट्रॅफिक!’ असा मनातल्या मनात त्रागा केला असेल, अशा गमतीदार प्रतिक्रिया समाज माध्यमात उमटल्या.

Story img Loader