Maharashtra Political Crisis, Eknath Shinde Live : राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला. यानंतर राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार धोक्यात येणार असे अनेक दावेही करण्यात येत आहेत. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. शिवसेनेकडून वारंवार एकनाथ शिंदेंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गुजरातमधील सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत १२ पेक्षा अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे रायगडमधील तिन्ही आमदारही संपर्क क्षेत्राबाहेर असून ते एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने त्यांनी बंड पुकारल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. एकूणच या प्रत्येक घडामोडीच्या अपडेट्सचा आढावा…
Eknath Shinde Live Updates Today : शिवसेना नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर असल्याने राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ उपस्थित होते. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे उपस्थित होते. एकनाथ शिंदे माझं ऐकतील असा विश्वास उद्धव ठाकरेंकडून यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही क्रॉस वोटिंग झालं. यातून महाविकास आघाडीच्या हाती पुन्हा पराभव आला आणि भाजपाने सलग दुसऱ्यांदा आपले सर्व उमेदवार जिंकून आणले. यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं राजकीय भूकंप निर्माण झाला. याच क्रॉस वोटिंगच्या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. तसेच त्यांच्याकडे १९८० मध्ये ६ आमदार असताना कसे ४५ आमदारांची मतं मिळवली, याचा किस्सा त्यांनी सांगितलं. ते दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गुजरातमधील सुरत याठिकाणी गेले होते. यावेळी नार्वेकर आणि शिंदे यांच्यात ४० मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समजत आहे. यावेळी नार्वेकर यांच्या फोनवरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
संजय राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत केवळ १८ आमदार होते हे वृत्त चुकीचं आहे. सुधारणपणे ३०-३१ आमदार उपस्थित होते. त्यांची यादी तिकडे आहे. गटनेतेपदी अजय चौधरी यांची एकमताने नियुक्ती झाली आहे. काही आमदार आमच्याशी दुरध्वनीवरून संपर्कात होते. सुहास कांदे, प्रताप सरनाईक, लता सोनावणे इत्यादी संध्याकाळपर्यंत पोहचतील."
"लता सोनावणे जात प्रमाणपत्राच्या एका खटल्याच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयात आहेत. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीचा खटला आहे त्यासाठी ते दिल्लीत न्यायालयात आहेत. सुहास कांदे यांना सकाळीच सीबीआयची नोटीस आली आणि ते सीबीआय कार्यालयात गेले. असे अनेक आमदार जिकडे तिकडे आहेत. त्यातील ३१ आमदार मुंबईत होते. त्यांची यादी आणि सह्या आहेत," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्यातील बैठक अर्ध्या तासात संपली, थोड्याच वेळात शिवसेना नेते माध्यमांशी बोलणार, शिवसेनेची भूमिका स्पष्ट होणार
दोन आमदारांना गुजरातमध्ये प्रचंड मारहाण, नितीन देशमुख यांना ह्रदय विकाराचा झटका, आम्हाला जेवणाला बोलावलं आणि गाडीत टाकून सुरतला आणलं असा आरोप आमदारांनी केलाय, कुटुंबांनी तक्रार केलीय, संजय राऊत यांचे गंभीर आरोप
एकनाथ शिंदे यांची अडचण मला माहिती, ईडी आणि सीबीआयचा आमच्यावरही दबाव, पण आम्ही पक्ष सोडला नाही, माझ्या पक्षासोबत गद्दारी केली नाही, काही लोक दबावात आलेत, अनेक आमदारांना धमक्या देण्यात आल्या, संजय राऊत यांचे गंभीर आरोप
दिल्लीतील बैठक तातडीने संपवून शरद पवार मुंबईला रवाना, विरोधी पक्षांच्या राष्ट्रपती उमेदवार निवडीच्या बैठकीसाठी पवार दिल्लीत होते, मुंबईत परतल्यानंतर महाविकासआघाडीकडून काय निर्णय होतात याकडे सर्वांचेच लक्ष
भागवत कराड म्हणाले, "राज्यसभा आणि विधान परिषदेत भाजपाला मिळालेल्या मतांवरून आमदार सरकारवर नाराज असल्याचं स्पष्ट दिसतंय."
काही काळ अडवल्यानंतर नार्वेकरांची गाडी हॉटेल मेरिडियनमध्ये सोडली, काही वेळातच बैठकीची शक्यता, एकनाथ शिंदे भेटीसाठी वेळ देतात की नाही यावरच बैठकीचं भविष्य
शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर व रविंद्र फाटक सुरतमध्ये दाखल, नार्वेकरांची गाडी हॉटेल मेरिडियन बाहेर अडवली, एकनाथ शिंदेंकडून ग्रीन सिग्नल नसल्याची चर्चा
मेरिडियन हॉटेलच्या शेजारील हॉटेलमध्ये शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर व रविंद्र फाटक पोहचले, एकनाथ शिंदेंकडून चर्चेस तयारी दर्शवल्यानंतर बैठक होणार, खासदार विनायक राऊतही पोहचण्याची शक्यता
"अनेक आमदारांच्या कुटुंबीयांना तक्रार केली आहे. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने त्यांचं अपहरण करून सुरतला नेल्याची आणि जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. आतापर्यंत ९ आमदारांच्या कुटुंबाने तक्रारी केल्या आहेत. हे असंच चालू राहिलं तर मुंबई पोलिसांना कठोर कारवाई करावी लागेल," असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील, तर त्यांना आम्ही मुंबईत येऊन चर्चा करण्यास सांगितलं आहे. गुजरातमध्ये जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही. त्या सर्वांना मुंबईला येण्यास सांगितलं आहे."
संजय राऊत म्हणाले, "आमदारांच्या बैठकीत गटनेतेपदाबाबत बदल करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे."
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जूनमधील वादळात महाविकास आघाडी सरकार कोसळून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतील, असे भाकीत १९ एप्रिल रोजी वाशीम दौऱ्यात केले होते. शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे नारायण राणेंनी दोन महिन्यांपूर्वी केलेले ते भाकीत आता चर्चेत आले आहे. राणेंचे भाकीत खरे ठरणार का, यावरून आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.
संजय राऊत म्हणाले, "बऱ्याच दिवसांपासून ऑपरेशन लोटस सुरू होतं. तसं नसतं तर आमच्या आमदारांचं अपहरण करून गुजरातला नेलं नसतं. त्यांना गुजरात पोलीस व केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आलंय. अनेक आमदारांनी तेथून सुटकेचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दहशत बसवण्यात आली. आमदारांवर खुनी हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. काही आमदारांनी आमच्या जीवाला धोका आहे, इथे आमचा खूनही होऊ शकतो, असं कळवलं आहे."
https://twitter.com/ChDadaPatil/status/1539179281141710849
चंद्रकांत पाटील म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना ट्विटमध्ये काय म्हणायचं आहे याबाबत 'समझनेवाले को इशारा काफी' एवढंच मी म्हणेल. आत्ता कुठलंही मत व्यक्त करणं थोडं घाईचं होईल. त्यामुळे 'वेट अँड वॉच' अशी भाजपाची स्थिती आहे. काल रात्री अचानक असा मेसेज आला की काहीजण असे नॉट रिचेबल आहेत. त्यातून हळूहळू विषय पुढे चालला आहे."
एकनाथ शिंदे – कौपरी
अब्दुल सत्तार – सिल्लोड – औरंगाबाद
शंभूराज देसाई – सातारा
संदीपान भुमरे – पैठण – औरंगाबाद
उदयाससह राजपूत – कन्नड – औरंगाबाद
भरत गोगावले – महाड – रायगड
नितीन देशमुख – बाळापूर – अकोला
अनिल बाबर – खानापूर – आटपाडी – सांगली
विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम
संजय गायकवाड – बुलढाणा
संजय रामुलकर – मेहकर
महेश सिंदे – कोरेगाव – सातारा
शहाजी पाटील – सांगोला – सोलापूर
प्रकाश आबिटकर – राधापुरी – कोल्हापूर
संजय राठोड – दिग्रस – यवतमाळ
ज्ञानराज चौघुले – उमरगास – उस्मानाबाद
तानाजी सावंत – पारोडा – उस्मानाबाद
संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम
रमेश बोरनारे – बैजापूर – औरंगाबाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान बोलावलेल्या बैठकीला उपस्थित असलेले शिवसेना आमदार, पदाधिकारी खालील प्रमाणे,
१. वैभव नाईक
२. दिवाकर रावते
३. उदयसिंग राजपूत
४. विनायक राऊत
५. नरेंद्र दराडे
६. अनिल देसाई
७. विकास पोतनीस
८. सुभाष देसाई
९. वरून सरदेसाई
१०. अरविंद सावंत
११. किशोर दराडे
१२. किशोर साळवी
१३. आमशा पाडवी
१४. चंद्रकांत रघुवंशी
१५. रवींद्र वायकर
१६. गुलाबराव पाटील
१७. संजय राऊत
१८. नीलम ताई गोरे
१९. दादा भुसे
२०. सचिन अहिर
२१. सुनील शिंदे
२२. संजय राठोड
२३. सचिन पडवळ
२४. अंबादास दानवे
२५. मंगेश कुडाळकर
२६. प्रकाश फातर्पेकर
२७. राहुल पाटील
२८. सुनील प्रभू
२९. दिलीप लांडे
३०. उदय सामंत
३१. राजन साळवी
३२. रमेश कोरगावकर
३३. अजय चौधरी
३४. राजू पेडणेकर
३५. दिपक केसरकर
३६. ज्योती ठाकरे
https://twitter.com/mieknathshinde/status/1539171911044718593
एकनाथ शिंदे म्हणाले, "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही."
कल्याण : विधान परिषद निवडणूक निकालानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे 'नॉट रीचेबल' झाल्यांनतर त्यांच्या खास मर्जीतील कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील संपर्काबाहेर गेले आहेत. आमदार भोईर यांचा मोबाईल स्विच ऑफ असून कुटुंबियांशी संपर्क साधला असता आमदार कुठे आहेत हे आपल्याला माहीत नसल्याचे सांगण्यात आले.
खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर आमदार भोईर हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आहेत. दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिक सकाळपासून राजकीय घडामोडींकडे लक्ष लावून बसले आहेत. दुसरीकडे कल्याण पोलिसांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला आहे.
भाजपा नेते संजय कुटे एकनाथ शिंदे थांबलेल्या सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा निरोप घेऊन ते पोहोचले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महाविकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी देखील असं बंड करण्यात आलं होतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. आमचा एक उमेदवार पराभूत झाल्यासंबंधी आम्ही चर्चा करु असं यावेळी त्यांनी सांगितलं. अडीच वर्ष सरकार योग्य चालत असल्यानं हे षडयंत्र आखण्यात आलं असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. तसंच राजकीय पेचातून मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मंगळवारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील त्यांचे खंदे समर्थक आमदार डॉ. बालाजी किणीकरही सोमवारी रात्रीपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉ. किणीकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र याबाबत त्यांच्या निकटवर्तीयांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. किणीकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह संपर्काबाहेर असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे १५ ते ३५ आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून दिपाली सय्यद यांनीदेखील ट्वीट केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं असून असून शिवसेनेचा वाघ झेपणार नाही अशा शब्दांत सुनावलं आहे.
शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून पोलिसांकडे तक्रार दाखल, मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर फोन बंद, कोणताही संपर्क नाही, सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येणार की काय? अशी शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. सकाळी राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची तातडीची बैठक झाली असताना दुसरीकडे राज्यातील भाजपाचे महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील दिल्लीला रवाना झाले आहे. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.
प्रसाद लाड म्हणाले, "शिवसेनेने दावा केला की त्यांची तीन मतं फुटली. त्यांनी हा दोष अपक्षांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शिवसेनेची १२ मतं फुटली आहेत. त्यात कोणते आमदार आहेत हे नावं सांगता येणार नाही, पण हा शिवसेनेला मोठा धक्का आहे. "
Eknath Shinde Live Updates Today : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय.