Maharashtra Political Crisis, Eknath Shinde Live : राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला. यानंतर राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार धोक्यात येणार असे अनेक दावेही करण्यात येत आहेत. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. शिवसेनेकडून वारंवार एकनाथ शिंदेंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गुजरातमधील सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत १२ पेक्षा अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे रायगडमधील तिन्ही आमदारही संपर्क क्षेत्राबाहेर असून ते एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने त्यांनी बंड पुकारल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. एकूणच या प्रत्येक घडामोडीच्या अपडेट्सचा आढावा…
Eknath Shinde Live Updates Today : शिवसेना नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर असल्याने राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय.
राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले. शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटल्याने महाविकास आघाडीला चिंता सतावत असतानाच एकनाथ शिंदे संपर्काबाहेर गेल्याने मोठा राजकीय भूकंप आला आहे. राज्यसभा निवडणूक निकालानंतर लोकसत्ताच्या १३ जूनच्या अग्रलेखात विश्लेषण करताना राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला होता. यावेळी राज्यात काय परिस्थिती उद्भवू शकते याचा सूचक इशाराही होता.
राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या ‘यशा’चे श्रेय निर्विवाद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल तसेच सत्ताधारी आघाडीच्या केविलवाण्या पराभवाचे अपश्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घ्यावे लागेल. अमर्याद साधनसंपत्ती, केंद्रीय यंत्रणांची अदृश्य पण वास्तव भीती आदी कितीही कारणे भाजपच्या यशामागे विरोधकांकडून दिली जात असली तरी त्या सर्वामागे फडणवीस आणि भाजपचे अथक राजकीय कौशल्य आहे हे मुळीच नाकारता येणारे नाही. मुळात ही निवडणूक व्हायला नको होती, गेल्या २४ वर्षांत अशी काही निवडणूक या राज्याने पाहिलेली नाही, तीमुळे घोडेबाजाराची संधी निर्माण झाली वगैरे सर्व चर्चा आता फजूल ठरते. हे सर्व होणार याचा अंदाज भाजपखेरीज अन्य पक्षांना होता तर मुदलात त्यांनी निवडणूक ओढवून घ्यायला नको होती. स्पर्धेत उतरायचे की नाही याचा निर्णय ती सुरू होण्याआधी करायचा असतो. एकदा का स्पर्धा सुरू झाली की ‘‘परिस्थिती मला अनुकूल नव्हती’’, ‘‘पंच नि:स्पृह नाहीत’’ वगैरे किरकिर करणे निरर्थक. सत्ताधारी महाविकास आघाडीने ती करू नये. आपल्याखालून गाढव निघून गेल्यावर ते का गेले वगैरेंचा ऊहापोह मनाला समाधान देणारा असला तरी त्यामुळे गेलेले गाढव काही परत येत नसते. म्हणून असे झाल्यावर पुढे काय, या प्रश्नास भिडणे अधिक महत्त्वाचे. याबाबतही हेच वास्तव अधिक गंभीर आहे. त्याच्या विश्लेषणात ‘फडणवीस यांना माणसे आपलीशी करण्यात यश मिळाले’ हे शरद पवार यांचे प्रतिक्रियात्मक विधान सर्वार्थाने सूचक.
राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या जवळपास १३ आमदारांसोबत संपर्काबाहेर आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गुजरातमध्ये सूरतमधील एका हॉटेलात आमदारांसोबत आहेत. दरम्यान सूरतमधील या हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतर कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आहे. पोलीस हॉटेलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही राजकीय पक्ष, एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव आल्यास आम्ही स्विकारू. संजय राऊत यांच्या महान नेतेगिरीमुळे शिवसेना अडचणीत आली. आम्ही शिवसेनेसोबत काम केलंय, त्यामुळे त्यांच्याविषयी प्रेम आहे. संजय राऊत शिवसेनेचं भयंकर नुकसान करत आहेत. ते नुकसान करण्याचं काम त्यांना कुणीतरी दिलंय.” ते एबीपी माझाशी बोलत होते.
एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये असलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख रुग्णालयात दाखल, पहाटे अस्वस्थ वाटल्याने, छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी सुरतच्या सिव्हिल रुग्णालयात, रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त
मुंबई : विधान परिषद निवडणुकीतील शिवसेनेचे विजयी उमेदवार आमशा पाडवी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.
थोड्याच वेळात एकनाथ शिंदे गुजरातमधील सुरत येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल येत आहेत. त्यांच्यासोबत एकूण १३ आमदार असून ते सध्या गुजरात राज्यातील सुरतमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हेदेखील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. नेहमीच नॉट रिचेबल असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचेच आमदार नॉट रिचेबल असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी अनेक आमदार मुंबईत दाखल होत वर्षा निवासस्थानाकडे जात आहेत. अनेक आमदार मुंबईबाहेर असल्याने १२ वाजताची बैठक उशिरा सुरू होण्याची शक्यता
नागपूर : नाना पटोले म्हणाले, “शिवसेनेचा बँड हा भाजपाच्या राजकारणाचा एक अध्याय आहे. पैसा आणि केंद्राच्या सत्तेचा गैरवापर होत आहे. भाजपाने असा मार्ग घेतलेला आहे. यात सत्याचाच विजय होईल. ऊन सावली हा निसर्गाचा नियम आहे. तसेच महाराष्ट्रात आलेल्या उन्हाचे सावलीत रूपांतर होईल. ही घटना रात्रीची आहे. मुंबईला सगळ्या नेत्यांची बैठक आहे. या सगळ्या गोष्टींची बैठकीत चर्चा केली जाईल.”
“सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी बहुमताचा आकडा अजून दूर आहे. निवडणुकीत मतदानाची बंडखोरी झाली आहे. याचं आत्मपरीक्षण केलं जाईन. आज मुंबईला जाणार आहे. सगळ्या आमदारांना बोलावलेलं आहे. तिथं या सगळ्या अडचणीतून बाहेर कसे पडता येईल आणि पार्टीची बळकटी कशी करता येईल यावर काँग्रेस भूमिका घेणार आहे,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.
नारायण राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.”
शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 21, 2022
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत तरी यश आलेलं नाही. असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही.
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे १३ आमदार असल्याचे बोलले जात आहे. सध्या शिंदे या १३ आमदारांसोबत गुजरातमध्ये असल्याचेही म्हटले जात आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीसांच्या या अचानक दिल्लीवारीमुळे आणखी संभ्रम वाढला आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला असताना एकनाथ शिंदे अचानक बेपत्ता झाले असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवारी विजयी झाले असताना शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटली आहेत. त्यातच एकनाथ शिंदेशी संपर्क होत नसल्याने त्यांनी बंड पुकारल्याची शक्यता व्यक्त होती आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत जवळपास २५ आमदार उपस्थित असल्याची चर्चा आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय झाला असला तरी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत यासंदर्भात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde Live Updates Today : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय.