Eknath Shinde : उद्धव ठाकरेंनी माझ्यावर अविश्वास दाखवला. मी महाविकास आघाडीच्या सरकारमध्य मंत्री होतो तरीही माझ्या खात्यात ते ढवळाढवळ करत होते. त्यांनी सरकार आलं त्यावेळी मला जर सांगितलं असतं की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे तर मी माहौल तयार केला असता. मात्र त्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या ज्या मला नंतर समजल्या. अशा गोष्टी राजकारणात लपून राहात नाहीत. एकीकडे मला सांगितलं की शरद पवारांनी मला मुख्यमंत्री व्हायला सांगितलं आहे आणि दुसरीकडे शरद पवारांनी मला सांगितलं की तो सर्वस्वी तुमच्या पक्षाचा निर्णय होता असं एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी म्हटलं आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) हे वक्तव्य केलं आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो तेव्हा मला झेड सुरक्षा प्रदान करायची होती तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी नकार दिला होता. मला माझ्या विरोधात काय काय गोष्टी चालल्या ते समजलं होतं. माझ्यासाठी ते शॉकिंग होतं. मला तेव्हा धमक्या आल्या होत्या. कारण नक्षल्यांचा खात्मा करण्याचं काम मी त्यावेळी केलं होतं. त्यावेळी मला झेड प्लस सुरक्षा देण्याचा विषय आला होता. गृहमंत्र्यांनी ठरवलं की झेड प्लस सुरक्षा द्यावी. मात्र उद्धव ठाकरेंनी फोन करुन मला तशी सुरक्षा देऊ नये सांगितलं. मला गृहमंत्री कार्यालयातूनच फोन आला होता. त्यावेळी मला अडकवण्याचा आणि तुरुंगात धाडण्याचाही प्रयत्न झाला. माझ्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला. ते विरोधी पक्षनेते होते मात्र मी तर उद्धव ठाकरेंच्या जवळचा होतो. त्यामुळे ते माझ्याशी असं का वागले याचं मला नवल वाटलं, आश्चर्यही वाटलं असं एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले.

हे पण वाचा Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी महिलांना धमकी? विरोधकांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

अनिल देशमुखांबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?

अनिल देशमुख हे जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा भ्रष्टाचार हा खुलेपणाने चालला होता. त्यावेळी मी उद्धव ठाकरे, अजित पवार यांना कल्पना दिली होती. गृहखातं हे कायदा सुव्यवस्था सांभाळणारं खातं आहे. मी म्हटलं होतं की भ्रष्टाचार खुलेपणाने चालला आहे त्यात तुम्ही लक्ष घाला. पण त्यावेळी भ्रष्टाचार बोकाळला होता. त्याची किंमत अनिल देशमुखांना मोजावी लागली. अनिल देशमुखांना उद्धव ठाकरेंनी सांगायला पाहिजे होतं. असंही एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) म्हटलं आहे.

Uddhav Thackeray News
उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री व्हायचं आहे हे उद्धव ठाकरेंचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं. त्यांना मी तेव्हा म्हणालो देखील की उद्धव ठाकरे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एका शब्दाने सांगायचं होतं मी सगळा माहौल तयार केला असता. तुम्ही म्हणालात मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. मग म्हणालात की शरद पवारांनी सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. मला एकदा विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर मी सगळा माहौल तयार केला असता. उद्धव ठाकरेंनी सगळ्या गोष्टी एकदम गुप्तपणे केल्या. मात्र या गोष्टी लपत नसतात. आम्हाला त्यांच्या लोकांनी सांगितलं. शरद पवारही म्हणाले की हा सर्वस्वी शिवसेनेचा प्रश्न होता.

भाजपाने उद्धव ठाकरेंना कुठलंही आश्वासन दिलं नव्हतं

भाजपाने त्यांना कुठलंही आश्वासन दिलं नव्हतं. भाजपाकडून उद्धव ठाकरेंना कुठलंही आश्वासन मिळालं नव्हतं. भाजपाच्या वरिष्ठांनी मला सांगितलं की मित्र पक्षाला जर मुख्यमंत्रीपद द्यायचं ठरलं असतं तर अडीच वर्षांची अडचण नव्हती. मित्र पक्षाचे कमी आमदार निवडून येऊनही इतर राज्यांमध्ये असा प्रयोग आपण केला आहे. ज्या दिवशी विधानसभेचे निकाल आले तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत. उद्धव ठाकरेंना हे समजलं होतं की मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपाशी युती ठेवून चालणार नाही. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचा पर्याय आणला असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Story img Loader