शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्यामागे भारतीय जनता पार्टीच असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. राज्यामध्ये निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांसाठी सर्व सुविधा पुरवण्यामागे भाजपाचा हात असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी या बंडामागे भाजपाचा हात असल्याचं वाटत नसल्याचं काही वेळापूर्वी म्हणाल्यानंतर लगेच शरद पवारांनी हा मुद्दा खोडून काढला. यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडावरुनच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिकेमध्ये मतभेद असल्याचं दिसून आलं.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

अजित पवार काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांना मागील दोन दिवसांमध्ये ४६ आमदारांनी समर्थन दर्शवलं आहे. शिंदे हे मंगळवारी काही बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेले. त्यानंतर बुधवारी पहाटे ते बंडखोर आमदारांसोबत गुवहाटीमध्ये दाखल झाले. सध्या हे सर्व आमदार गुवहाटीमध्येच असून ठाकरे सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळपासून मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठकी पार पडल्यानंतर सायंकाळी शरद पवारांनी यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्राकारांशी बोलताना अजित पवारांना या बंडामागे भाजपा आहे असं वाटतं का असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “अजून तरी तसं काही दिसलं नाही,” असं म्हटलंय. पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा हाच प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी, “आताच्या घडीला कुठलाही भाजपाचा नेता किंवा मोठा चेहरा तिथं येऊन काही करतोय असं दिसत नाही,” असं अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं. 

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार यांना अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपा असल्याचं वाटत नाही असं म्हटल्याचं सांगत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी, “अजित पवार यांनी फक्त मुंबईमधील परिस्थिती पाहून वक्तव्य केलेलं असावं. त्यांना राज्याबाहेरची परिस्थिती माहिती नाही. ती आम्हाला माहीत आहे,” असं उत्तर दिलं. पुढे बोलताना शरद पवारांनी, “आपण एकनाथ शिंदेचा एका व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये त्यांनी आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं सांगितलं,” असंही म्हटलं.

नक्की वाचा >> “अजित पवारांसारखं एकनाथ शिंदेंचं बंड फसणार नाही, कारण…”; आठवलेंचं वक्तव्य, कविताही केली सादर

पवारांनी निवडणूक आयोगानुसार राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत याची यादी वाचून दाखवली. त्यामध्ये भाजपा, मायावती, सीपीआय, सीपीआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी ही नावं घेतली. त्यानंतर पुढे बोलताना शरद पवारांनी, “भाजपाचे गुजरात राज्याचे अध्यक्ष पाटील यांचा सहभाग असेल याचा अर्थ काय समजायचा? आसाममध्ये संपूर्ण व्यवस्था करण्यामध्ये तेथील राज्य सरकार अतिशय सक्रीय आहे. तिथलं राज्य सध्या भाजपाच्या हातात आहे. नावं घ्यायची गरज नाही. तिथं जे दिसतायत त्यावरुन कोण आहे हे कळतंय,” असं म्हणत भाजपावर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> आनंद दिघेंचा पुतण्या घेणार एकनाथ शिंदेंची जागा?; केदार दिघे म्हणाले, “आनंद दिघे गेल्यानंतर मी…”

शरद पवार यांनी यावेळी बोलताना अजित पवारांपेक्षा आपल्याला गुवहाटी आणि राज्याबाहेरील राजकारणाची अधिक माहिती असल्याचंही म्हटलं. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी बंडखोर आमदार पुन्हा मुंबईत येतील तेव्हा ते नक्कीच उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारतील असा विश्वास व्यक्त केला.

Story img Loader