Amit Thackeray on Shivsena Split : २००९ मध्ये महाविकास आघाडी सत्तेवर येऊन २०२१ ला पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेत झालेली बंडखोरीमुळे सरकार कोसळलं. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. त्यामुळे शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेलं. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते आणि माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
२०२१ च्या जून महिन्यात शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन भाजपाला समर्थन दिलं. त्यामुळे शिवसेनेकडे आणि पर्यायाने महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याने त्यांना सत्ता सोडावी लागली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तर, दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपाने त्यांच्याकडे असलेलं बहुमत सिद्ध केलं अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. राज्यात एकीकडे अशी उलथापालथ झालेली असताना शिवसेनेतील बंडाळीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचली.
पुरावे, बहुमत आणि इतर कायदेशीर प्रक्रियांनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना मूळ शिवसेना म्हणून सिद्ध झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच पक्षाचं अधिकृत चिन्ह असलेलं धनुष्यबाणही मिळालं. यावरून अमित ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत बोलताना अमित ठाकरे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी पक्षाचं चिन्हआणि नाव घेतलं, ते चुकीचं केलं. नागरिक म्हणून पाहताना ते मला चुकीचं वाटतंय. पक्षचिन्ह आणि पक्षनाव बाळासाहेबांचं आहे, ते त्यांचंच राहायला पाहिजे होतं. लोकांच्या विश्वासाने त्यांनी हे निर्माण केलं होतं.”
हेही वाचा >> अमित ठाकरेंचा निवडणूक लढवण्याचा निर्णय, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय होती? स्वत: सांगितला ‘तो’ प्रसंग!
निवडणुकीनंतर महायुतीबरोबर जाणार का? (MNS BJP Alliance)
पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा असेल असं सूचक विधान राज ठाकरे यांनी केलं. त्याची री ओढत अमित ठाकरे म्हणाले, आमच्यासमोर महाविकास आघाडी आणि महायुती असा पर्याय असेल तर आम्ही महायुतीबरोबर जाऊ.”
अमित ठाकरेंविरोधात उमेदवार, राज ठाकरे म्हणतात…
“मी आदित्यसाठी विचार केला होता की माझ्याविरोधातला पक्ष असला तरी राजकारण आणि नातेसंबंध हे मी वेगळं बघतो. मी लहानपणापासून त्या विचारात वाढलोय. मला तेव्हा असं वाटलं की वरळीत आदित्यच्या समोर उमेदवार नको उभा करूयात. हा माझा विचार झाला. मी जसा विचार करतोय, तसा सूज्ञ समोरचाही विचार करेलच अशी मी अपेक्षा नाही धरत. मी ती गोष्ट चांगल्या विचारानं केली. समोरच्याला तसं वाटलं तर त्यांनी करावी, नाहीतर करू नये”, असं राज ठाकरे म्हणाले.
h
© IE Online Media Services (P) Ltd