मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नुकतेच दिल्ली दौऱ्याहून परतले आहेत. या दौऱ्यात शिंदे, फडणवीस यांनी भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या बैठकांमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेतली. दिल्लीवरुन परतल्यानंतर शिंदे पंढरपुरात दाखल झाले. आज पंढरपुरात बोलताना त्यांनी मोदींसोबतच्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत सांगितले आहे. शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी, कष्टाकऱ्यांसाठी, उद्योग वाढीसाठी जे करता येईल ते करा, असे मोदींनी सांगितले आहे, अशी माहिती शिंदे यांनी भाषणामध्ये दिली.

हेही वाचा >>> “लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न…” उद्याच्या सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

“महाराष्ट्रात जेवढं काही चांगलं करता येईल ते करा. शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी, कष्टाकऱ्यांसाठी, उद्योग वाढीसाठी जे करता येईल ते करा. केंद्र सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे मोदींनी सांगितले,” असे शिंदे म्हणाले. तसेच पुढे बोलताना हे सरकार सर्वसामान्यांचे आहे, असेदेखील शिंदे यांनी सांगितले. “भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली, असे सगळे पक्ष म्हणत होते. मुख्यमंत्रीपदासाठी, सत्तेसाठी भाजपाकडून हे केले जात आहे, असे म्हटले जात होते. मात्र मला संधी दिल्यानंतर कोणालाही विश्वास वाटत नव्हता. भाजपाने मला संधी का? दिली कारण बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी राज्यातील जनतेची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने काय झालं ते तुम्हाला माहिती आहे. पण हा एकनाथ शिंदे माझा आहे, सरकार माझं आहे, सर्वसामान्यांचं आहे, असे आज प्रत्येकाला वाटत आहे. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही,” असे शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> मुंबई : शाहू महाराज की स्वातंत्र्यवीर सावरकर? छात्रभारतीच्या मागणीनंतर विद्यापीठाच्या वसतीगृह नामकरणावरुन वाद पेटण्याची शक्यता

“सत्तेसाठी आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी तडजोड केली नाही. सभागृहामध्ये सावरकरांबद्दल काही घटक पक्ष बोलत होते. आम्हाला दु:ख वाटायचं. पण त्यावेळी आम्हाला मूग गिळून बसावं लागत होतं. ज्या मुंबईत दाऊदने बॉम्बस्फोट केले, ज्याच्याशी त्यांचं कनेक्शन झालं; त्यांच्याबद्दल बोलता येत नव्हतं. बाळासाहेबांनी जे विचार मांडले ती भूमिकादेखील आम्हाला मांडता येत नव्हती,” अशी खदखद शिंदे यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली.

Story img Loader