Eknath Shinde Oath Taking Ceremony: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या चर्चांना सुरुवात झाली. भाजपा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीसच होतील, असं मानलं जात होतं. मात्र, याची प्रत्यक्ष अधिकृत घोषणा होण्यासाठी १० दिवस गेले. त्यानंतरही राज्यात एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदावरून बरीच संदिग्धता पाहायला मिळाली. अनिश्चितता एवढी वाढली की अगदी शपथविधीच्या दोन तास आधी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं जाहीर करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्रीपद इतर कुणालातरी देण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार होता, अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय घडलं उपमुख्यमंत्रीपदाबाबत?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर अजित पवार त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हेदेखील स्पष्ट झालं. खुद्द अजित पवारांनीच पत्रकार परिषदेत हे जाहीर केलं होतं. पण एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठी संदिग्धता निर्माण झाली होती. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नाहीत अशी चर्चा होती. त्याचबरोबर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचाही उपमुख्यमंत्रीपदासाठी विचार होत असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज अखेर एकनाथ शिंदेंच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे जाहीर करण्यात आलं.

eknath shinde took oath as deputy cm with ajit pawar and devendra fadnavis cm
Eknath Shinde: शपथविधीच्या दोन तास आधी एकनाथ शिंदे झाले राजी; पडद्यामागे नेमकं असं काय घडलं?
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Devendra Fadnavis and Eknath shinde
Maharashtra Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, एकनाथ शिंदेंबाबत सस्पेन्स कायम!
Gulabrao Patil on Eknath Shinde
Gulabrao Patil : ‘…तोपर्यंत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळायला हवं होतं’, शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान
Eknath Shinde On Chief Ministership
Eknath Shinde : मुख्यमंत्री कोण होणार? हालचालींना वेग; दिल्लीत दाखल होताच एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले, “कोणत्याही पदापेक्षा…”
Eknath Shinde
Eknath Shinde : “एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला नाही, तर…”, ठाकरे गटाचा मोठा दावा
Eknath Shinde on dcm
Eknath Shinde : मुख्यमंत्री पदाचा चेंडू भाजपाच्या कोर्टात, उपमुख्यमंत्री अन् मंत्रिमंडळाचं काय? एकनाथ शिंदे म्हणाले…
Prayers For Eknath Shinde and Devendra Fadnavis
Maharashtra CM Post : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शिवसैनिकांचं विठ्ठलाला साकडं, तर पुण्यात देवेंद्र फडणवीसांसाठी देव पाण्यात

काय म्हणाले उदय सामंत?

उदय सामंत यांनी आज आधी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एकनाथ शिंदे यांचा निर्णय कळवला. त्यांच्याकडून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं पत्र घेतलं आणि ते राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सुपूर्द केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केलं.

“आज साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे. आम्ही शिवसेनेच्या वतीने सर्वच आमदारांनी एकनाथ शिंदेंना विनंती केली होती की कोणत्याही स्थितीत त्यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायला हवं. शिवसेना आमदार, शिवसैनिक, महायुतीचे आमदार व देवेंद्र फडणवीसांनी स्वत: केलेली विनंती याला मान देऊन एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं मान्य केलं. आम्ही त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आलो होतो. त्यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शिफारसीचं पत्र आम्हाला त्यांनी दिलं. ते आम्ही आता राजभवनावर येऊन प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्याकडे सुपूर्द केलं आहे”, असं ते म्हणाले.

Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला!

उपमुख्यमंत्रीपदासाठी दुसरा पर्याय?

दरम्यान, एकनाथ शिंदे संधी दुसऱ्या कुणालातरी देण्याचा विचार करत होते, असे सूतोवाच उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिले. “देवेंद्र फडणवीस असो किंवा आम्ही माजी मंत्री असोत, शिवसेनेचे पदाधिकारी-खासदार असोत, आम्हा सगळ्यांची इच्छा होती की एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये असणं आमच्या दृष्टीने आवश्यक होतं. आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदेंना तशी विनंती केली होती. एकनाथ शिंदेंनी संघटन प्रमुख म्हणून, पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर फिरून पक्षाचं काम करायचं आणि इतर कुणालातरी संधी द्यायची हा विचार केला होता. पण हे आम्हाला मान्य नाही असं आम्ही त्यांना सांगितलं. ते उपमुख्यमंत्री व्हायला हवेत, ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा होती. ती आज एकनाथ शिंदेंनी पूर्ण केली त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत”, असंही उदय सामंत म्हणाले.

Story img Loader