Eknath Shinde : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे सुरु आहेत. या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज महायुतीची एकत्रित जाहीर सभा कोल्हापूरमध्ये पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी १० मोठी आश्वासने दिली आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, २५ हजार महिलांची पोलीस भरती अशी १० मोठी आश्वासने दिली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“२०१४ साली झालेल्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात याच ठिकाणावरून आम्ही केली होती. आता देखील या ठिकाणाहून प्रचाराची सुरुवात आम्ही करत आहोत. आता २३ तारखेला आम्ही विजयाचा गुलाल घेतल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा आहे, त्या जाहीरनाम्यातील १० प्रमुख आश्वासने आज या ठिकाणी मी तुमच्यासमोर सांगत आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. त्यामुळे आता आम्ही लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये करणार असल्याचं आश्वासन आम्ही देत आहोत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “मोदींच्या अशुभ हातांनी उभा केलेला शिवरायांचा पुतळा…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

मुख्यमंत्री शिंदेंनी कोणते १० आश्वासन दिले?

-लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये देण्याचं आश्वासन.
– २५ हजार महिलांची पोलीस दलात भरती करण्याचं आश्वासन.
– शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेसह राज्य आणि केंद्राचे मिळून आता १५ हजार करणार.
– तसेच एमएसपीवर २० टक्के अनुदान देण्याचं आश्वासन आम्ही देत आहोत.
– वृद्ध पेन्शन योजनेमध्ये आता १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये करण्यात येणार आहेत.
– २५ लाख रोजगार निर्मिती करण्याचं काम आम्ही करणार आहोत, तसेच १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचं आश्वासन.
– २५ हजार गावात रस्ते बाधण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. शहराच्या विकासाबरोबरच गावाचाही विकास
करण्याचं आश्वासन
– अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार आणि विमा सुरक्षा देण्याचं आश्वासन.
– विजबिलामध्ये ३० टक्के कपात करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत.
– महायुतीचं सरकार आल्यानंतर ‘व्हिजन २०२९’ हे १०० दिवसांच्या आत सादर करण्याचं आश्वासन.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आज एकत्र कोल्हापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० प्रमुख आश्वासने मुख्यमंत्री शिंदे यांनी वाचून दाखवली. तसेच हे फक्त ट्रेलर असून सविस्तर जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde on gave 10 big promises ladki bahin yojna loan waiver for farmers police recruitment of 25 thousand women maharashtra assembly elections 2024 gkt